शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास ५ हजार दंड : नागपूर महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:57 PM

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप या निर्णयाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित घरमालक वा व्यापाऱ्याला ५ हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देप्रशासन हतबल असल्याने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप या निर्णयाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित घरमालक वा व्यापाऱ्याला ५ हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले.शहरातील डेंग्यूचा वाढता प्रकोप विचारात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या वर्षी जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. परंतु परंतु रॅलीला हिरवी झेंडी दाखवणाऱ्या लोकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या सापडत असल्याचे झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले होते.सभागृहात श्रद्धा पाठक यांनी डेंग्यूचा मुद्दा उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही यावर ठोस निर्णयाची मागणी केली. याचा विचार करता महापौरांनी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना ५ हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. मात्र आधीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असताना दुसऱ्या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार असा प्रश्न आहे.निर्देशानंतरही दूषित पाण्याची समस्या कायममहापौरांनी दूषित पाण्याची समस्या सात दिवसात निकाली काढण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही प्रभाग २१ मधील समस्या सुटलेली नाही. सभागृहात पाण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र पाणी समस्याबाबत महापौर गंभीर नसल्याचा आरोप नगरसेविका आभा पांडे यांनी केला. शहरातील सर्व भागात समान पाणी वितरणाची घोषणा वारंवार करण्यात आली. मात्र त्याची अंमलजावणी होत नाही. चार झोनमध्ये पाणी समस्या आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या गंभीर होणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू