लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.
नागपुरात गांधीजींवर १६३ देशांचे ५००० वर टपाल साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 8:25 PM
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महात्म्य केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मान्य केले जाते. त्यामुळेच कोणत्याही देशाचे राष्ट्रीय प्रतीक समजल्या जाणाऱ्या टपाल साहित्यावर या महात्म्याला स्थान दिले आहे. जगभरातील १६३ देशांनी या अहिंसेच्या पुजाऱ्यावर ५००० पेक्षा अधिक टपाल तिकिटे, स्टॅम्प, पोस्टकार्ड आदी प्रकाशित करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनचेही त्यांच्या राजघराण्याव्यतिरिक्त पहिल्या नेत्याचे तिकीट होते ते महात्मा गांधी यांचेच. भारतासह जगभरात प्रकाशित झालेल्या अशा दुर्मिळ टपाल साहित्य, नाणी, नोटा यांचे प्रदर्शन जीपीओच्या फिलाटेली विभागात लावण्यात आले.
ठळक मुद्देडाक तिकिटांमधून उलगडते राष्ट्रपित्याचे महात्म्यजीपीओमध्ये फिलाटेली संग्रहकांचे प्रदर्शन