शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

भाजपातून ५४ बंडोबांची हकालपट्टी

By admin | Published: February 10, 2017 2:32 AM

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना भोवले आहे.

सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई : संघ निष्ठावंतांचाही समावेशनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना भोवले आहे. संघभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी पक्षाने गंभीरतेने घेतली असून, ५४ जणांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निलंबितांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा बाळगून असलेल्यांचा समावेश आहे.शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करीत निवडणुकांचा अर्ज दाखल केला. कुणी शिवसेना, बसपा यासारख्या पक्षाची कास धरली तर अनेकांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले. शहरातील १० हून अधिक जागांवर तर संघ स्वयंसेवकच भाजप उमेदवारांविरोधातच उभे ठाकले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात पक्षातर्फे ‘डॅमेज कंट्रोल’ची मोहीम राबविण्यात आली. यामुळे अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र अनेकांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवला. पक्ष कार्यकारिणीने ही एकूण बाबच गंभीरतेने घेतली व ५४ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा गुरुवारी निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनमंत्री भोजराज डुंबे यांनी दिली. या यादीत विद्यमान नगरसेवकांसोबतच शहर कार्यकारिणीतील सदस्यांचादेखील समावेश आहे हे विशेष. पक्षशिस्त सर्वांना सारखी आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांना पक्षात कुठलीही जागा नाही. तिकीट मिळाले नाही, म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलणे अयोग्यच आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)यांच्यावर झाली निलंबनाची कारवाईअनिल धावडे, अनिता वानखेडे, डॉ. विशाखा जोशी, श्रीपाद रिसालदार, विशाखा मैंद, सुलोचना कोवे, रामदास गुडधे, रामकुमार गुप्ता, प्रज्ञा ढोरे, रवी मस्के, बाळा पुरोहित, वीणा कुकडे, चंदा धोटे, निहारिका भाम्बूळकर, मंजूषा भाम्बूळकर, आशिष मोहिते, लता मंडावी, संगीता बनाफर, जीवन रामटेके, शैलेश घोंगे, मालती मामीडवार, अनिता साखरकर, प्रसन्ना पातूरकर, पंकज पटेल, श्यामराव सोनकर, शिवपालसिंह, ज्ञानेश्वर साव, उषा अदगाळे, पिंकू वाडवे, नामदेव भोरकर, राजेंद्र धकाते, भास्कर पराते, विशाल लारोकर, गिरधारी निमजे, सुनील श्रीवास, वैशाली उदापूरकर, किरण फटिंग, शिरीष पुरोहित, विलास पराते, सुधीर जांभूळकर, खेमराज दमाहे, वनिता दमाहे, ज्योती जनबंधू, नितीन नागदेवते, मूलचंद शंभरगडे, उमेश मेंढे, दुर्गा पाटील, कमलेश धारणे, देवराव देवधरे, सुरेखा जांगीरवार, शोभा पटेल, जयश्री ढाले, प्रवीण पाटील, अशोक शेरिकुंजाम.