शहरं
Join us  
Trending Stories
1
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
2
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
4
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
5
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
6
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
7
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
8
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
9
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
10
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
11
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
12
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
13
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
14
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
15
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
16
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
17
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
18
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
19
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
20
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 

हायटेन्शन लाईनचा ५४६ घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:41 AM

शहरामध्ये ५४६ घरांना हायटेन्शन लाईनचा धोका असल्याची माहिती महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात माहिती : घरमालकांची यादी देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये ५४६ घरांना हायटेन्शन लाईनचा धोका असल्याची माहिती महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.हायटेन्शन लाईनपासून इमारतीचे अंतर किती असावे यासंदर्भात वीज कायद्यात तरतूद आहे. हायटेन्शन लाईन आधीच अस्तित्वात असल्यास घर बांधणाºयाने या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, रहिवासी भागातून हायटेन्शन लाईन टाकायची असल्यास महावितरणला नियमांचे पालन करावे लागते. शहरामध्ये ५४६ घरांच्या बाबतीत कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सर्व घरमालकांची यादी सादर करण्याचा आदेश मनपाला दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने मनपाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियांश व पीयूष धर या भावंडांचा हायटेन्शन लाईनच्या धक्यामुळे मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्याची दखल घेऊन यावर स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.भूमिगत वीज वाहिनीची योजना द्याशहरात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी महावितरणला २०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी केवळ ४ कोटी रुपये खर्च झाले असून १९६ कोटी रुपये महावितरणकडे अद्याप पडून आहेत. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने यासंदर्भातील योजनेची माहिती सादर करण्याचा आदेश महावितरणला दिला व भूमिगत वीज वाहिनीचा निधी अन्य कामांसाठी खर्च करण्यास मनाई केली. तसेच, याप्रकरणात केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व केंद्रीय वीज प्राधिकरण यांना प्रतिवादी करण्याची अ‍ॅड. भांडारकर यांना अनुमती दिली.