शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

अखंडित वीज पुरवठ्यासाठी ५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:39 AM

नागपूर शहराला शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याचा दावा करीत यासाठी ५५ कोटी रुपये दिले जाणार असून ३० कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा लवकरच दिले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे १०० कोटी आणखी देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्या हाती घेतली. यादरम्यान शहराला शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याचा दावा करीत यासाठी ५५ कोटी रुपये दिले जाणार असून ३० कोटी रुपये आणखी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १०० कोटी रुपये सुद्धा लवकरच दिले जातील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बावनकुळे यांनी सांगितले की, या निधीच्या माध्यमातून वीज नेटवर्क सशक्त करून २४ तास वीज पुरवठा केला जाईल. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, विजेचे दर महावितरणच्या नियंत्रणात नसतात. वीज नियामक आयोग ते निश्चित करीत असतो. एसएनडीएलने लावलेले वीज मिटर अधिक गतीने फिरतात यावरील प्रश्नावर बावनकुळे यांनी ते मीटर महावितरणने स्वीकृत केले असल्याचे स्पष्ट केले.हानी कमीकरण्यासाठीच फ्रेन्चाईजीबावनकुळे यांनी स्पष्ट केले की, वीज वितरण हानी कमी करण्यासाठीच फ्रेन्चाईजी नियुक्त केली जाते. सध्या भिवंडी येथे फे्रन्चाईजी कार्यरत आहे. याशिवाय कळवा, मालेगाव येथे विचाराधीन आहे. महावितरणने येथेही वीज वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही तेथे वीज हानी ७० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे फ्रेन्चाईजी दिली जात आहे.व्हेंडरला काम आणि थकीत रक्कमही मिळणारएसएनडीएलचे काम करणाऱ्या व्हेंडर्सना यापुढेही काम दिले जाईल. त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोजगारही दिला जाईल, असे ऊर्जामंत्री यांनी स्पष्ट केले. महावितरणला एसएनडीएलच्या व्हेंडरचे जवळपास ३५ कोटी रुपये देणे आहे तर ग्राहकांवर ७० कोटी रुपये लाईव्ह थकीत आहे. महावितरण टप्याटप्प्याने दोन महिन्यात ही रक्कम वसूल करेल.

एसएनडीएल कर्मचाऱ्यांनी घातला घेरावपत्रपरिषदेनंतर बावनकुळे यांना एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी घेराव घालत नोकरीची गॅरंटी देण्याची मागणी केली. बावनकुळे यांनी यावेळी त्यांना सांगितले की, स्थायी कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही एसएनडीएलची आहे. तरीही कुणावर अन्याय होणार नाही, यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्यांनी सांगितले की, महावितरण या कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तृतीय श्रेणीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना टेंडर जारी करण्याचे आश्वासनही दिले. एक वर्षापर्यंत कुणाचीही नोकरी जाणार नाही, असेही आश्वस्त केले.

टॅग्स :electricityवीज