निविदा काढल्या : प्रायोगिक कालावधी वाढविण्यासाठी मागणीनागपूर : इथेनॉलवर चालणारी ग्रीन बस शहरात वर्षभरापासून प्रायोगिक तत्त्वावर धावत आहे. हा कालावधी २९ फे ब्रुवारीला संपत आहे. स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने प्रायोगिक कालावधी पुन्हा सहा महिने वाढविण्याची मागणी केली आहे. याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ५५ नवीन ग्रीन बस खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याने जून २०१६ पर्यंत या बसेस शहरातील रस्त्यांवर धावतील, अशी अपेक्षा आहे. इथेनॉलवर चालणारी ग्रीन बस प्रयोगिक तत्त्वावर नागपुरात सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी या प्रकल्पासंदर्भात गंभीर आहेत. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली. नागपुरात हा प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर देशभरातील मोठ्या शहरात ही वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू के ली जाणार आहे. एक वर्षापासून रिझर्व्ह बँक चौक ते खापरी दरम्यान ग्रीन बस धावत आहे. या बसची वाहतूक यशस्वी व किफायशीर ठरली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार नवीन बस आॅपरेटरची नियुक्ती, १५० डिझेल बस व ५५ ग्रीन बस खरेदी केल्या जाणार आहेत. ग्रीन बस वातानुकूलित असून तिकीट सामान्य श्रेणीचे असल्याने याचा लाभ प्रवाशांना होणार आहे. जूनपर्यंत शहरात ग्रीन बस प्राप्त होतील, असा विश्वास परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
जूनपर्यंत धावतील ५५ ग्रीन बस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 3:09 AM