लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह राज्यातील २७ शहरांमधील ध्वनिप्रदूषणाचा नीरीकडून अभ्यास करण्यात आला. यातून नागपुरातील स्थितीदेखील समोर आली आहे. शहरातील ५५हून अधिक जागा ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये आहेत. यामुळे शहरातील नागरिकांसह पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग वाढविण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला नीरीच्या वैज्ञानिकांनी दिला आहे. सोबतच आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी वाहनांवर नॉइज एटीएम लावण्याचा सल्लादेखील देण्यात आला.
या बैठकीला खासदार विकास महात्मे, संचालक डॉ. एस. चंद्रशेखर, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. साधना रायलू, रसायन व घातक कचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. ए.एन. वैद्य, वेस्ट वॉटर टेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. रितेश विजय, माजी महापौर अनिल सोले, जनआक्रोशचे रवि कासखेडीकर, डॉ. प्रशांत निखाडे, श्याम भालेराव उपस्थित होते.
ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली पाहिजे. नीरी यासाठी प्रयत्न करत आहे, असे डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले.