लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटीच्या ५६ बसेसचे आयुष्य संपल्यामुळे त्या भंगारात जाणार आहेत. या बसेस तसेच इतर भंगाराच्या माध्यमातून एसटीला दोन कोटींंचा फायदा होणार आहे.दीड वर्षापासून अधिक काळ होऊनही एसटीने भंगार विकण्यासाठी निविदा काढली नाही. या स्थितीत एसटीच्या ५६ बसेस आणि इतर भंगार जमा झाले. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. उत्पन्नाचे काहीच स्त्रोत शिल्लक नव्हते. अशा स्थितीत शासनाने मदत केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बसेसच्या देखभालीचे काम करण्यात आले. परंतु प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे महामंडळाला प्रति किलोमीटर ३० ते ४० रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटीने भंगारातील बसेसची विकण्याची तयारी केली. अद्याप त्यासाठी तारीख ठरविलेली नाही. परंतु लवकरच या बसेसबाबत निविदा काढण्यात येणार आहे. नियमानुसार वर्षातून दोन वेळा भंगार बसेस आणि इतर साहित्याबाबत निविदा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यशाळेच्या परिसरात भंगार साचत नाही. परंतु कोरोनामुळे या भंगार बसेसची निविदा काढण्यात आली नाही. यापूर्वी २०१९ मध्ये ३५ बसेस भंगारात काढण्यात आल्या. त्यातून महामंडळाला ३४ लाखांपेक्षा अधिक महसुल मिळला. अशा स्थितीत ५६ बसेस आणि इतर वस्तूंपासून दोन कोटी रुपये मिळणार आहेत.लवकरच काढणार बसेस भंगारातएसटीच्या बसेस भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यापासून दोन कोटींचे उत्त्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु निविदा कधी काढायची, हे ठरविण्यात आलेले नाही. नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.
एसटीच्या ५६ बसेस जाणार भंगारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 1:05 AM
State Transport Buses, scrapped, Nagpur News एसटीच्या ५६ बसेसचे आयुष्य संपल्यामुळे त्या भंगारात जाणार आहेत. या बसेस तसेच इतर भंगाराच्या माध्यमातून एसटीला दोन कोटींंचा फायदा होणार आहे.
ठळक मुद्दे एसटीला होणार दोन कोटींचा फायदा : आयुष्य संपल्यामुळे घेतला निर्णय