शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बंदीनंतरही ५.६० टक्के पीओपी मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:09 AM

शहरात १ लाखावर मूर्ती विसर्जन : १२७.६८ टन निर्माल्य संकलन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनंत चतुर्थीला शहरामध्ये ...

शहरात १ लाखावर मूर्ती विसर्जन : १२७.६८ टन निर्माल्य संकलन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनंत चतुर्थीला शहरामध्ये दहाही झोन अंतर्गत १ लाख २७ हजार ७७६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे बंदी असूनही यात ६७८५ पीओपी मूर्तींचा समावेश आहे. हे प्रमाण ५.६० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्र शासनाने पीओपी मूर्तींची खरेदी, विक्री व आयातीवर बंदी आणल्यानंतर नागपूर शहरामध्ये पीओपी मूर्ती विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक दुकानांवर कारवाई केली. दुकाने सील करण्यात आली. त्यानंतरही विसर्जनानंतर ५.६० टक्के पीओपी मूर्ती आढळून आल्या.

भाविकांची सुविधा व्हावी यासाठी मनपाने शहराच्या सर्वच भागात २७० कृत्रिम तलावांसह फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. यात नागरिकांनी श्रीगणेशाचे विसर्जन केले. याशिवाय अनेकांनी घरीच मूर्ती विसर्जन केले. पथकाव्दारे १२७.६८ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

शहरातील सर्व तलावांवर गणेश विसर्जनास बंदी घातली आहे. त्यादृष्टीने तलावांना टिनाचे शेड लावून बंद करण्यात आले. त्याऐवजी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळी मनपातर्फे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच नागरिकांना त्यांच्या दारापुढे, परिसरात श्रीगणेशाचे विसर्जन करता यावे याकरिता फिरते विसर्जन कुंडाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मातीच्या १ लाख २० हजार ९९१ मूर्तीं तर ६७८५ पीओपी मूर्ती अशा एकूण १ लाख २७ हजार ७७६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

...

झोननिहाय गणेश विसर्जन

झोन कृत्रिम तलाव विसर्जित पीओपी मूर्ती मातीच्या मूर्ती विसर्जित एकूण मूर्ती संकलित निर्माल्य (टनामध्ये)

लक्ष्मीनगर २६ ३७० १०९८० ११३५० ९.२९

धरमपेठ ५१ २३२६ ३७८४५ ४०१७१ २८.७१

हनुमाननगर ३८ १११८ १००५६ १११७४ ८.८६

धंतोली २२ २९२ ६७६६ ७०५८ १२.९२

नेहरूनगर ४० ४४८ १४६९३ १५१४१ १६

गांधीबाग २६ १४४ ८८२५ ८९६९ १०.९

सतरंजीपुरा १८ ४९९ ११०७९ ११५७८ ७.३८

लकडगंज २० १५१ ६९०६ ७०५७ १५.७८

आशीनगर १३ ४३ ७८६ ८२९ ९.४६

मंगळवारी १६ १३९४ १३०५५ १४४४९ ८.३८

एकूण २७० ६७८५ १२०९९१ १२७७७६ १२७.६०