लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आहे.गेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. वाढत्या वाहनामुळे शहरातील विविध मार्गावर वाहतुकीचा ताण पडला आहे. यामुळे शहरात मोठी कोंडी होऊन त्याचा फटका नागपुरकरांना बसत आहे. तज्ज्ञाच्या मते याला एक मुख्य कारण म्हणजे, सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत ५५ पटींनी झालेली वाढ. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने आहेत. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात नव्या ३३१७८ मोटार सायकल, १०२७९ स्कूटर्स तर २२१५ मोपेड वाहनांची अशी मिळून एकूण ४५६७२ दुचाकींची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली आहे. चारचाकी वाहनांमध्ये ३८८३ मोटार कार्स, ११८३ जीप, २८५ ट्युरीस्ट कॅबस्, १०८ आॅटो रिक्षा, १८२ स्कूल बसेस, १७६७ ट्रक्स, १४९२ ट्रॅक्टर्ससह इतरही वाहनांचे प्रकार मिळून ११५२३ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.
नागपूर विभागात वर्षभरात ५७ हजार नव्या वाहनांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:27 PM
प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आहे.
ठळक मुद्देनागपूर ग्रामीण विभाग : दुचाकीची संख्या सर्वाधिक