नागपुरात ५७३ घरांना हायटेन्शन लाईनचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:37 PM2017-11-29T23:37:18+5:302017-11-29T23:39:07+5:30

573 houses in Nagpur have the risk of high tention line | नागपुरात ५७३ घरांना हायटेन्शन लाईनचा धोका 

नागपुरात ५७३ घरांना हायटेन्शन लाईनचा धोका 

Next
ठळक मुद्देमनपाची माहिती : हायकोर्टात घरमालकांची यादी सादर

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : शहरामध्ये ५७३ घरे हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असल्याची माहिती महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली तसेच घलमालकांची यादीही सादर केली.
हायटेन्शन लाईनपासून इमारतीचे अंतर किती असावे, यासंदर्भात वीज कायद्यात तरतूद आहे. हायटेन्शन लाईन आधीच अस्तित्वात असल्यास घर बांधणाऱ्याने या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, रहिवासी भागातून हायटेन्शन लाईन टाकायची असल्यास महावितरणला नियमांचे पालन करावे लागते. परंतु, शहरामध्ये ५७३ घरे हायटेन्शन लाईनपासून धोकादायक अंतरावर असल्याचे मनपाच्या तपासणीत आढळून आले आहे. यासंदर्भात उद्या, गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी प्रकरणावरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. याविषयी जनहित याचिका प्रलंबित असून, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर हे या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.

Web Title: 573 houses in Nagpur have the risk of high tention line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.