गणेश हुडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी कर वसुलीवर भर देण्याची गरज आहे. मात्र मागील सात महिन्यापासून यंत्रणा कोविड - १९ च्या नियंत्रणात लागल्याने मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. ३.८७ लाख मालमत्ताधारकांकडे तब्बल ५७५ कोटीची थकबाकी आहे. यात शासकीय व निमशासकीय मालमत्ता, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, होर्डिंग्ज व खासगी अशा ५११ मालमत्ताधारकांकडे थकीत असलेल्या २२० कोटीचा समावेश आहे.कर आकारणी व कर संकलन विभागाच्या नोंदीनुसार नागपूर शहरात ६.३५ लाख मालमत्ता आहेत. २०२०-२१ या वर्षात ५ लाख ९४ हजार ७०० मालमत्ताधारकांकडून १९७ कोटी कर येणे आहे, तर २३ आॅक्टोबरपर्यंत १००.१३ कोटीची वसुली झाली आहे. मागील वर्षात याच कालावधीत ११७ कोटीची वसुली झाली होती. मोठ्या प्रमाणात नवीन मालमत्तावर कर आकारण्यात आल्याने वित्त वर्षात कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र कोरोनाचा वसुलीला फटका बसला आहे. दिलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.
६.३५ लाख मालमत्ताधारकांपैकी १ लाख ९५ हजार ३९६ मालमत्ताधारकांकडे ५ हजारापर्यंत कर येणे आहे. त्यांच्याकडे ४६ कोटी थकीत आहे. ५ ते २५ हजारापर्यंत थकीत मालमत्ता कर असलेल्यांची संख्या १ लाख ६७ हजार ६९४ आहे. त्यांच्याकडून १८२ कोटी येणे आहे. २५ ते ५० हजारापर्यंत १६ हजार ८६९ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ५६ कोटी थकीत आहे. ५० हजार ते १ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या ४ हजार ४६७ मालमत्ताधारकांकडून ३० कोटी, १ ते ५ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या २ हजार १३० मालमत्ताधारकांकडे ४१ कोटी थकीत आहे. ५ लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ५११ मालमत्ताधारकांकडे २२० कोटी थकीत आहे.
उद्दिष्ट २९० कोटी, तीन महिन्यात जमा २४.६२ कोटीमनपा आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीसाठी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वषार्साठी २९० कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. यात दर महिन्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु एप्रिल ते जून या तीन महिन्यात जेमतेम २४.६२ कोटीची वसुली झाली.कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारीमनपाच्या कर आकारणी व वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर कोविड नियंत्रणाची जबाबदारी होती. आता माझे कुटुंब व माझी जबाबदारी सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी कर वसुलीवर परिणाम झाला आहे. कोविड-१९ चा फटका कर वसुलीला बसला आहे.नवीन मालमत्तांचा समावेशआजवर कर आकारण्यात न आलेल्या मालमत्तांवर प्रथमच कर आकारण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या मोठी आहे. अशा मालमत्तांवर मागील सहा वषार्पासून कर आकारणी करण्यात आल्याने थकबाकीत भर पडली आहे. त्यात कोरोनाचाही वसुलीवर परिणाम झाला.मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त