शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

विदर्भात दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; रुग्णसंख्या १,४३,६५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:06 PM

विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे२,१०९ रुग्णांची भरमृतांची संख्या ३,८३२

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे. नागपुरात ८६२, चंद्रपूरमध्ये २३०, गोंदियात २२९ तर अमरावतीमध्ये २०४ रुग्ण आढळून आले.

नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावली असताना आता मृत्यूच्या संख्येतही घट आली आहे. ३० रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या २,४१३ झाली असून रुग्णसंख्या ७५,६८३ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज २३० रुग्णांची भर पडली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ९,८१२ तर मृतांची संख्या १४८ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात २२९ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. बाधितांची एकूण संख्या ४,१७४ झाली. या जिल्ह्यातही पाच रुग्णांचे बळी गेले असून मृतांची संख्या ९३ वर गेली आहे. अमरावती जिल्ह्यात २०४ रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५१०७ तर मृतांची संख्या २७९ वर गेली आहे.

भंडारा जिल्ह्यात १५७ रुग्ण व दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५१०७ झाली असून मृतांची संख्या १०५वर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यात ८९ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ८५ रुग्ण व चार रुग्णांचे बळी गेले. बुलडाणा जिल्ह्यात ८४ रुग्ण व दोन बळी गेले. वर्धा जिल्ह्यात ६६ रुग्ण व सहा मृत्यूची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात ५१ रुग्ण पॉझिटिव्ह व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात ४९ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस