शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

६० दिवसापासून नव्यांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:07 AM

नागपूर : कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला असला तरी मागील ६० दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ...

नागपूर : कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला असला तरी मागील ६० दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. मंगळवारी १९ रुग्णांची भर पडली असताना सात पटीने १३८ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९८.०५ टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,७७,०२७ तर, मृतांची संख्या ९,०२५ असून मागील चार दिवसापासून स्थिरावली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. परंतु मे महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होऊ लागली. ३० एप्रिल रोजी

पहिल्यांदाच ६,४६१ नव्या रुग्णांची नोंद झाली असताना, त्याच्या अधिक, ७,३८८ रुग्ण बरे झाले. त्यानंतर सलग दोन महिने नव्यांच्या तुलनेत कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहिली. आज ७,०७८ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२६ टक्के होता. शहरात ५,४९४ चाचण्यातून ११ नवे रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटीचा दर ०.२० टक्के होता. ग्रामीणमध्ये १,५८४ चाचण्यातून ८ रुग्णांची भर पडली असून, पॉझिटिव्हिटीचा दर ०.५० टक्के होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४०२ झाली. यात शासकीय व खासगी रुग्णालयात १५२ तर होम आयसोलेशनमध्ये २५० रुग्ण आहेत. सलग चौथ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली.

:: कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ७,०७८

शहर : ११ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ८ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७७,०२७

ए. सक्रिय रुग्ण : ४०२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,६७,६००

ए. मृत्यू : ९,०२५