शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

जीएसटी अनुदानातून सहा महिन्यात ६०० कोटी मिळाले : मनपाच्या आर्थिक स्थितीत होत आहे सुधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 11:23 PM

GST Fund, NMC कोविड संक्रमण कमी होत असल्याने व जीएसटी अनुदान वाढून मिळाल्याने महापालिकेच्या स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी, जीएसटी अनुदान ९३.५० कोटी रुपयाहून वाढून १००.०५ कोटी झाल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देविकासकार्यांना मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड संक्रमण कमी होत असल्याने व जीएसटी अनुदान वाढून मिळाल्याने महापालिकेच्या स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी, जीएसटी अनुदान ९३.५० कोटी रुपयाहून वाढून १००.०५ कोटी झाल्याचा दावा केला आहे. एप्रिल व मे महिन्यात अनुदानाच्या रुपात ५०-५० कोटी रुपये प्राप्त झाले होते, मात्र जूनमध्ये त्यात वाढ झाली आहे. जुनी थकबाकीही मिळायला लागली आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान राज्य शासनातर्फे २२ सप्टेंबरला जाहीर परिपत्रकानुसार आवश्यक नवीन कामेही सुरू करता येणार आहेत. त्यामुळे नागपूर शहरात पुन्हा विकास कार्य सुरू होतील, असे मत व्यक्त केले जात आहे.पत्रकारांशी चर्चा करताना झलके यांनी एप्रिल महिन्यापासून जीएसटी अनुदान वाढून मिळत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत महापालिकेला ६०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाने ४ मे रोजी कोणतेही कार्य सुरू करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र २२ सप्टेंबर रोजी शासनाने संशोधित आदेश जारी करीत महपालिका, नगरपरिषद व नगर पंचायतींना ४ मे चे आदेश लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना या नवीन आदेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय केळीबाग रोडच्या कामासाठी २९९ कोटींचे विशेष अनुदानही प्राप्त झाले आहे. त्यांच्या मते मनपाच्या संपत्ती कर, जल कर, नगर रचना, बाजार विभागाला वसुलीवर लक्ष देण्याची गरज आहे, तेव्हाच महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधार होईल. 

स्थायी समितीचे बजेट २० पूर्वीस्थायी समिती १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती झलके यांनी दिली. कोविड संक्रमणामुळे बजेट सादर करण्यास उशीर झालेला आहे, मात्र बजेटची तयारी पूर्ण झाल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली. मात्र बजेट सभा ऑनलाईन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सुरेश भट सभागृहात बजेट सभा घेण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागाला परवानगी देण्याबाबत पत्र पाठविल्याचे झलके यांनी सांगितले. मात्र शासनाकडून उत्तर आले नाही. १५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू होणार आहेत. त्यामुळे सुरक्षित अंतराच्या नियमानुसार सुरेश भट सभागृहात बजेट सभा घेतली जाऊ शकते.आर्थिक समीक्षा मंगळवारीमनपाच्या आर्थिक स्थितीची समीक्षा करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये महापौरांसह जनप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतच कमाई आणि खर्चाचा तपशील मागविण्यात येईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGSTजीएसटीfundsनिधी