लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती दीक्षाभूमी ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचे आचरणशील प्रतीक मानल्या जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी व आकर्षक रोषणाईने अवघी दीक्षाभूमी सजत आहे. मंगळवारी पंचशीलचा ध्वज खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळया पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरू होते.दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी ही निळ्या पाखरांनी आणि पंचशील ध्वजाने सजते. या वर्षीही जागोजागी धम्मध्वज लावले जात आहे. तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशीलला अनुसरून असलेला हा पंचशील ध्वज स्तूपाकडे जाण्याच्या मार्गावर, स्तूपाच्या सभोवताल व परिसरात जागोजागी उभारले जात आहे. या दिनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सोर्इंची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी उभारण्यात येणारे भव्य धम्ममंच, पंचशीलचे झेंडे व आकर्षक रोषणाईच्या कामासाठी आंबेडकरी चळवळीतीलच कार्यकर्ते सतत झटत आहेत.२४ तास पिण्याचे पाणीदीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जात आहे. कायमस्वरुपी नळांना २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी टँक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.सफाईची जबाबदारी ९०० कर्मचाऱ्यांवर१८ व १९ आॅक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे या दरम्यान महापालिकेतर्फे साफसफाईसाठी प्रत्येक शिफ्टला ३०० सफाई कामगारांची २४ तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरुपाची शौचालय व स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी व महानगर पालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचे कार्यही सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.आरोग्याची विशेष काळजीदीक्षाभूमीवर येणाऱ्या
आज धम्मपरिषद व संविधानाचा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर सुरु असलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या अंतर्गत १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते करण्यात येईल. या परिषदेला जपान, थायलँड, मलेशिया, म्यानमार आदींसह देशविदेशातील प्रतिनिधी सहभागी होतील. यानंतर रात्री ९ वाजता अश्वघोष आर्ट अॅण्ड कल्चरल फाऊंडेशन कोल्हापूरतर्फे संविधानाचा जागर हा संगीतमय कार्यक्रम होईल. तत्पूर्वी बुधवारी सकाळी ९ वाजता स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी समितीचे सदस्य ना.रा. सुटे, अॅड. आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले प्रामुख्यने उपस्थित राहतील.