लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ६३ नागरिकांविरुध्द कारवाई करून ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६९६३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ६८ लाख ४०हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ५, हनुमाननगर २, धंतोली झोन १६, नेहरुनगर ६, आशीनगर झोन अंतर्गत ६, मंगळवारी झोन अंतर्गत ४ आणि मनपा मुख्यालयातील १ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात आहे.