नागपूर : कृषिपंप कनेक्शन धाेरणांतर्गत गेल्या ६ महिन्यात ६३३८४ पारंपरिक कृषी पंप विद्युत कनेक्शन देण्यात आले आहेत. हे सर्व ग्राहक ते आहेत ज्यांनी ३१ मार्च २०१८ पूर्वीच वीज जाेडणीसाठी पैसे भरले हाेते. उरलेल्या ग्राहकांनाही लवकरच कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी साेलर पंप कृषी धाेरणाची घाेषणा केली आहे. याअंतर्गत १ एप्रिलपासून प्रलंबित १ लाख ६६ हजार ३५९ आवेदकांमधून ६३ हजार ३८४ ग्राहकांना कनेक्शन देण्यात आले. उर्वरित ग्राहकांना कनेक्शन देण्यासाठी उपकेंद्र, ट्रान्सफार्मर, विद्युत लाईन आदींवर कार्य सुरू आहे. कृषी ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेल्या निधीमधून ६६ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्ह्याची वितरण प्रणाली सशक्त करण्यासाठी खर्च केला जात आहे. आतापर्यंत यामध्ये ९३९.५० काेटी निधी गाेळा झाले आहे. ग्रामीण क्षेत्रातून आतापर्यंत २०७० काेटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
महावितरणने जागेचे निरीक्षण करून १२२७ काेटींच्या कामांना तांत्रिक व्यावहारिकतेची मंजुरी दिली आहे. ९९१.३८ काेटी रुपयांच्या २१ हजार २१ कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सर्वाधिक कनेक्शन पुण्यात
धाेरणांतर्गत आतापर्यंत सर्वाधिक ३१ हजार ८५१ कनेक्शन पुणे प्रादेशिक विभागात जारी करण्यात आले आहेत. १६ हजार १५ कनेक्शनसह काेकण दुसऱ्या स्थानावर आहे. नागपूर प्रादेशिक विभागात १० हजार ६९९ तर औरंगाबादमध्ये ४७५० कृषी पंप कनेक्शन देण्यात आले आहेत.