शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नागपुरात नऊ महिन्यांत ६४ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:29 AM

गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदीड हजारांहून अधिक आत्महत्याघरफोडी, चेनस्नॅचिंगमध्ये घट, एकूण गुन्हे मात्र वाढले

आॅनलाईन लोकमतनागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. तर या कालावधीत दीड हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. दरदिवसाला सरासरी पाच जणांनी जीव दिला असल्याचे आकडेवारी सांगत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, आत्महत्यांचे प्रमाण, बलात्कार इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ७,२३७ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ४,२३७ आरोपींना अटक करण्यात आली. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत ६,३७९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा खुनांचे ६४ गुन्हे दाखल झाले. ७ महिला, ४८ पुरुष तर ९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले.दरोडे घटले, फसवणूक वाढली४दरम्यान, शहरात दरोड्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात १७ दरोड्यांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा आठवर आला असून यात २७ आरोपींना अटक झाली आहे. सोबतच ‘चेनस्नॅचिंग’चे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत १३४ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा सप्टेंबरअखेरीस हा आकडा ७२ इतका होता. मात्र फसवणुकीमध्ये वाढ झाली आहे. यंदा नऊ महिन्यात फसवणुकीचे ३४८ गुन्हे दाखल करण्यात आले. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत हीच संख्या २६४ इतकी होती. बलात्कार कमी कधी होणार ?४महिला सुरक्षेचे पोलीस प्रशासनातर्फे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात बलात्कारांच्या घटनांमध्ये फारशी घट झालेली नाही. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात बलात्काराचे १२२ गुन्हे दाखल झाले. यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हा