............
मलेशियाच्या युवतीने लावला चुना
नागपूर : दारू आणि मसाल्याच्या व्यवसायात मदत करण्याची बतावणी करुन मलेशियातील युवतीने ५.६६ लाखाने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. रघुजीनगर येथील रहिवासी देवेंद्र कळंबे यांची १० एप्रिलला कथित ब्रिटनी नावाच्या युवतीची ओळख झाली. ब्रिटनीने कळंबेला मसाला आणि दारुच्या व्यवसायात मदत करण्याचे आमिष दाखविले. तिने कळंबे यांच्याकडून एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ५.६६ लाख रुपये घेतले. त्यानंतरही ती पैसे मागत असल्यामुळे कळंबे यांना संशय आला. त्यांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
.............
व्हॉट्सॲप स्टेटसवरून वाद, दोन जखमी
नागपूर : व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरून दोन गटात वाद झाल्यामुळे झालेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हुडको कॉलनी येथील रहिवासी १९ वर्षांच्या लकी भगवेचा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवण्यावरून सूरज जांभूळकर, अभिषेक मेश्राम आणि ऋषी नागदेवे सोबत वाद झाला. १३ सप्टेंबरला लकी वाद निपटवून घरी परत येत होता. दरम्यान, सूरज जांभूळकरने चाकूने हल्ला करून लकीला जखमी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या लकी भगवेने सायमन भगवे तसेच अभिषेक दरवाडेच्या मदतीने सूरज जांभूळकरवर हल्ला केला. त्याच्या पाठीवर चाकूने वार करुन जखमी केले. जरीपटका पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
...........