शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

जिल्ह्यात ६६ टक्के आरटीईचे प्रवेश पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:06 AM

प्रवेशासाठी पुन्हा वाढविली मुदत : काही तांत्रिक अडचणी व पालकांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने प्रवेशावर काहीसा परिणाम नागपूर : ...

प्रवेशासाठी पुन्हा वाढविली मुदत : काही तांत्रिक अडचणी व पालकांना अपेक्षित शाळा न मिळाल्याने प्रवेशावर काहीसा परिणाम

नागपूर : आरटीईची प्रवेशप्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६ टक्के प्रवेश झाल्याने पुन्हा २३ जुलैपर्यंत प्रवेशास मुदतवाढ दिली. विशेष म्हणजे यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती, नंतर ती ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.

दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे बालकांची प्रवेशप्रक्रिया विलंबाने सुरू झाली. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शिवाय शासनानेही निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गती मंद असल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात ६६ टक्केच प्रवेश झाले आहे.

- दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत शाळांची नोंद - ६८०

एकूण जागा - ५७२९

आतापर्यंत झालेले प्रवेश - ३७८६

शिल्लक जागा - १९४३

- २३ जुलै पर्यंत प्रवेश निश्चित करा

कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली. ३० जूनपर्यंत पालकांना शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते. दरम्यान शिक्षण विभागाने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा २३ जुलैपर्यंत पालकांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

- शाळांचे पैसे सरकार कधी देणार?

तीन वर्षापासून आरटीईचे पैसे सरकारवर थकीत आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर राज्यासाठी ५० कोटी रुपये देऊन एकप्रकारे तोंडाला पाणी पुसले आहे. शाळेची फी पालकांनी भरली नाही. वीज बिल, टॅक्स शाळांचे माफ करायला हवे होते. शाळा कशी चालवावी हा प्रश्न आहे. खरे तर शाळा कायमच्या बंद करण्यावर संस्थाचालकांची मानसिकता झाली आहे. आम्ही प्रशासनाला आवाहन करतोय की या परिस्थितीत तुम्हीच शाळा चालवून दाखवाव्यात.

कपिल उमाळे, सचिव, मेस्टा

- प्रवेशासाठी येताहेत अडचणी

पहिल्या राऊंडमध्ये निवड झालेल्या बालकांना १ किलोमीटरच्या आतील शाळेत प्रवेश मिळायला हवा होता. परंतु बालकांची निवड ३ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत झाली आहे. त्यामुळे पालकांना शाळेत टाकण्याची मानसिकता नाही. काही शाळेत आरटीईच्या प्रवेशासाठी अ‍ॅक्टिव्हीटी फी आकारली जात आहे. काही पालकांना प्रवेशासाठी मॅसेज आला पण शाळेने त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतला नाही. कारण शाळेसोबत विभागाने पाठपुरावा केला नाही. अनेक पालकांचे कागदपत्र पूर्ण नाही. त्यामुळे प्रवेशावर परिणाम झाला आहे.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

- जिल्ह्यात आरटीईला चांगला प्रतिसाद

जिल्ह्यात दरवर्षी आरटीईला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही ६६ टक्के प्रवेश निश्चित झाले आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यात अपेक्षित प्रवेश न झाल्याने वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यालाही ती लागू करून घ्यावी लागत आहे. काही पालकांना अपेक्षित शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारले असेल, तरीही प्रतिसाद चांगला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.