लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाची तपासणी करण्यसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या १३ नमुन्यांमधून ७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वृत्त आत्ताच हाती आले आहे.मंगळवारी यवतमाळ जिल्ह्याून १३ नमुने नागपुरात तपासणी करिता आले होते. तसेच वाशिम जिल्ह्यातून ६ नमुने आले होते. यातील यवतमाळच्या नमुन्यामधून ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तर वाशिममधील नमुन्यांमधून १ जण कोरोनाबाधित असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.बुधवारी वाढलेल्या या आकडेवारीमुळे आता विदर्भात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ वर गेली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी
नागपूर-१८बुलडाणा-११गोंदिया-१चंद्रपूर-१अमरावती-४वाशिम-१यवतमाळ-८अकोला-२