नागपूर : विदर्भात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. मागील २४ तासात ७४ रुग्णांचे बळी गेले तर, ५,८५४ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ४,१८,९१२ झाली असून, मृतांची सनख्या ८,१५३ वर गेली आहे. मृत्यूदर वाढून १.९४ टक्के झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोमवारी सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले. ४० मृत्यू व ३,५९६ रुग्णांची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात १३ रुग्णांचे जीव गेले व २४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अमरावती जिल्ह्यात ५ मृत्यू व ३६५ रुग्ण, बुलडाणा जिल्ह्यात ४ मृत्यू व ५०६ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ४ मृत्यू व ११६ रुग्ण, अकोला जिल्ह्यात ३ व ३६७ रुग्ण तर चंद्रपूर जिल्ह्यात ३ मृत्यू व १२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३५९६ : १९६६७६ : ४०
गोंदिया : ५७: १५१४४ : ००
भंडारा : ११२: १५२०४ : ०१
चंद्रपूर :१२३ : २५८५६: ०३
वर्धा : ११६ : १६६७९ : ०४
गडचिरोली :२३ : १०१६४ : ००
अमरावती : ३६५ : ४५७६० : ०५
यवतमाळ :२४७ : २४८४०: १३
वाशिम :३४२ : १३२०० : ०१
बुलडाणा :५०६ : ३०६१३ : ०४
अकोला :३६७ : २४७७६ : ०३