धरमपेठ झोन लसीकरणात आघाडीवर : सतरंजीपुरामध्ये सर्वात कमी प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जानेवारी महिन्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. गुरुवारपर्यंत नागपूर शहरातील १३ लाख २५ हजार ८२५ म्हणजेच ७५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर ३१ टक्के म्हणजे ५ लाख ५३ हजार ९८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
शहरातील २८,७६,६६५ नागरिकांपैकी १८ वषार्पुढील १७,५४,७६६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अर्थात लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या ६१ टक्के होती. त्यापैकी १८ ते ४५ वर्ष वयोगटातील ४०.०७ टक्के, ४५ ते ६० वर्ष वयोगटातील १२.५ टक्के तर ६० वर्षांवरील ८.५ टक्के नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.
धरमपेठ झोन क्षेत्रातील १९५४५४ नागरिकांनी पहिला तर ९५७१२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सतरंजीपुरा झोन क्षेत्रातील ५२९७७ नागरिकांनी पहिला तर २०८७६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
मनपा तर्फे निराधार, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसलेले नागरिक, परदेशात शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे व स्लम वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
१४ सप्टेंबरच्या अहवालानुसार, लसीकरणासाठी पात्र ६१ टक्के नागरिकांच्या उद्दिष्टांपैकी १८ ते ४५ वयोगटातील ४०.०७ टक्के नागरिकांपैकी ६४ टक्के (७४३८१७) नागरिकांचा पहिला डोस तर १५ टक्के (१७९३५६) नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र नागरिकांची संख्या १२.५ टक्के आहे. त्यापैकी ९८ टक्के (३५३९७२) नागरिकांचा पहिला डोस तर २२ टक्के (७८१६९) नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.
...........जोड आहे....