शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

डेंग्यूच्या रुग्णांत ७७ टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:12 AM

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील चार वर्षांच्या तुलनेत या ...

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालल्याने चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील चार वर्षांच्या तुलनेत या वर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे.

पूर्व विदर्भाला डेंग्यूने घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. ताप कमी झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होत असल्याने गंभीर रुग्णांची संख्याही वाढली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून २०१८ मध्ये ११९० रुग्ण - ११ मृत्यू, २०१९ मध्ये १३१६ रुग्ण - ११ मृत्यू, २०२० मध्ये ५०३ रुग्ण - २ मृत्यू तर ऑगस्ट २०२१पर्यंत २२०७ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. पाऊस लांबल्यास सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतही मोठ्या संख्येत डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांच्या तुलनेत या वर्षी नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप दिसून येत आहे. २०१९मध्ये ७४१, २०२०मध्ये १६१ तर ऑगस्ट २०२१पर्यंत १४०७ रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात २०१९मध्ये ४६५, २०२०मध्ये २०४ तर २०२१मध्ये ३६० रुग्ण आढळून आले. गोंदिया जिल्ह्यात २०१९मध्ये ३७, २०२०मध्ये ४ तर या वर्षी १२१, भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये १०, २०२०मध्ये ८ तर २०२१मध्ये ३६ तर गडचिरोली जिल्ह्यात २०१९मध्ये ११, २०२०मध्ये १६ तर २०२१मध्ये २५ रुग्णांची नोंद झाली.

-ऑगस्ट महिना ठरला धोकादायक

ऑगस्ट महिन्यात सहाही जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचा धोका वाढताना दिसून आला. नागपूर ग्रामीणमध्ये ७९० तर शहरात ६१७, भंडारा जिल्ह्यात ३६, गोंदिया जिल्ह्यात १२१, चंद्रपूर ग्रामीणमध्ये १९३ तर शहरात १६७, गडचिरोली जिल्ह्यात २५ तर वर्धा जिल्ह्यात २५८ रुग्ण आढळून आले.

-डेंग्यूची जबाबदारी प्रत्येकाची

डेंग्यूला नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. घरात व परिसरात पाणी साचून राहणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. दिवसाही झोपताना मच्छरदाणीचा वापर करायला हवा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत. डेंग्यूचा डास हा साधारण सकाळी व सायंकाळी चावतो. यामुळे या वेळेत विशेष काळजी घ्यावी. कुठलीही लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. श्याम निमगडे, सहायक संचालक (हिवताप) आरोग्य सेवा, नागपूर

-सहा जिल्ह्यांतील डेंग्यूची आकडेवारी

वर्ष : डेंग्यू रुग्ण :मृत्यू

२०१८ ११९० ११

२०१९ १३१६ ११

२०२० ५०३ ०२

२०२१ २२०७ ०९

जिल्हा : रुग्ण : मृत्यू

नागपूर (ग्रामीण) : ७९० : ०३

शहर : ६१७ : ०३

भंडारा : ३६ : ०१

गोंदिया : १२१ : ००

चंद्रपूर (ग्रामीण) : १९३ : ०१

शहर : १६७ : ००

गडचिरोली : २५ :००

वर्धा : २५८ : ०१