शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 9:57 PM

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार खेळाच्या किमान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच विभागीय क्रीडा संकुलांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याची शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत कामठी-कोराडी क्रीडा संंकुलासाठी राज्य शासनाने १.७५ कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. नुकतेच शासनाने या निर्णयाचे एक परिपत्रक जारी केले आहे.

ठळक मुद्देकामठी-कोराडी क्रीडा संकुलासाठी १.७५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या क्रीडा धोरणानुसार खेळाच्या किमान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच विभागीय क्रीडा संकुलांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याची शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत कामठी-कोराडी क्रीडा संंकुलासाठी राज्य शासनाने १.७५ कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. नुकतेच शासनाने या निर्णयाचे एक परिपत्रक जारी केले आहे.जिल्हा क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा चार कोटींवरून आठ कोटी व विभागीय क्रीडा संकुलाची मर्यादा १६ कोटींवरून २४ कोटी एवढी करण्यात आली आहे. नागपूरच्या वाढीव २४२० लक्ष रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली. विभागीय क्रीडा संकुल नागपूर व गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलासाठी १३ कोटी ८५ लाख रुपयांच्या तरतुदीपैकी ९७० लाख रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ७ कोटी ८४ लाख नागपूर विभागीय क्रीडा संकुल व १ कोटी ८६ लाख गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलासाठी मंजूर करण्यात आले आहेत. तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा शासनाने २१ मार्च २००९ नुसार २५ लाखाहून १ कोटी एवढी केली आहे. कामठी-कोराडी क्रीडा संकुलासाठी नोव्हेंबर २०१८ च्या अधिवेशनात २.५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. राज्य क्रीडा विकास समितीला तालुका क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांसाठी तांत्रिक, प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचे अधिकार आहेत. या समितीच्या बैठकीतील चर्चेनुसार क्रीडा संचालनालयाच्या २३ मार्च २०१६ च्या पत्रानुसार कामठी-कोराडी तालुका क्रीडा संकुलाच्या ६१० लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.क्रीडा व युवक संचालनालयाच्या पत्रानुसार कामठी-कोराडी तालुका क्रीडा संकुलाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे अथसंकल्पित करण्यात आलेल्या २.५० कोटींची तरतुदीपैकी १.७५ कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सन २०१८-१९ मध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्राची आस्थापना यासाठी उपलब्ध झालेल्या ३३.५२ कोटी एवढ्या तरतुदीतून हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

टॅग्स :fundsनिधीnagpurनागपूर