शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात  ८३९ मद्यपि चालकांची उतरवली झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:23 PM

शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता.

ठळक मुद्देदारूच्या नशेत रुग्णवाहिका, स्कूल व्हॅनचा चालक : रंगपंचमीला ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. सणासुदीच्या काळात याला आळा घालण्यासाठी दरवर्षी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते. असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता.वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यात मद्यपि चालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. याला आळा बसावा विशेषत: धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त (वाहतूक) एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनातील या मोहिमेत शहराच्या हद्दीत ८३९ मद्यपि वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.वाहतूक चेंबर २ अंतर्गत १६८ मद्यपिंवर कारवाईचेंबर-०२ अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) जयेश भांडारकर यांनी १६८ मद्यपि वाहनचालकांविरुद्ध ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई केली. विशेष म्हणजे, दारू पिऊन वाहन चालवू नये यासंदर्भातील आवाहन वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले होते.रुग्ण, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक धोक्यातया विशेष मोहिमेत एमएच ३१ डीएस २५६१ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा चालक नीळकंठ तिजारे, रा. दत्तमंदिर गोधनी रेल्वे आणि एमएच ४९ जे ०२५४ या क्रमांकाचा स्कूल व्हॅनचालक नंदकिशोर गोंडाणे, रा. नंदनवन हे दोघेही दारू पिऊन वाहन चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांच्यावरही १८४/१८५ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. रुग्णवाहिका व स्कूल व्हॅन दारू पिऊन चालविली जात असल्याने रुग्ण व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला धक्का बसला आहे.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८liquor banदारूबंदी