वसीम कुरैशी
नागपूर : ब्रिटिशकाळातील ८ अवजड ताेफा शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात सजविण्यात येणार आहेत. ताेफांच्या सजावटीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, लवकरच ई-टेंडर काढण्यात येणार आहे.
२०१९ साली पावसाळ्यात मेट्राेच्या कामादरम्यान कस्तुरचंद पार्कवर झालेल्या खाेदकामात या ब्रिटिशकालीन ताेफा सापडल्या हाेत्या. त्यांना मध्यवर्ती संग्रहालयात आणण्यात आले हाेते. तेव्हापासून संग्रहालयाचे आकर्षण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात हाेते. पुढे काेराेनामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला.
प्रमुख बिंदू
- १७६० साली ब्रिटेनमध्ये तयार झाल्या या ताेफा
- समुद्री मार्गाने आणल्यानंतर कस्तुरचंद पार्कवर त्या ठेवण्यात आल्या.
- ब्रिटिशकाळात कस्तुरचंद पार्क इंग्रजांचा ताेफखाना हाेता.
- स्वातंत्र्यानंतर इंग्रज या ताेफा येथेच ठेवून गेले.
- अनेक वर्ष पाऊस झेलत आपल्याच वजनाने त्या जमिनीत रूतल्या गेल्या.
- ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्या जमिनीतच हाेत्या.
नुकतेच सजावटीच्या खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंंजुरी मिळाल्यानंतर ई-निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनंतर या निविदा जारी करण्यात येतील. या ऐतिहासिक ताेफांना त्यांच्या मूळ स्वरूपात आणून संग्रहालयाच्या विशिष्ट ठिकाणी स्थापित करण्यात येतील.
- जया वाहने, अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय.