लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८ मे रोजी पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आले होते. २२ मे रोजी प्रतिबंध हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानतंरही प्रतिबंध न हटविल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्बंध हटविण्याची मागणी केली. तर नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन मागणी केली होती. अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्रस्ट ले-आऊट भागातील ८० कंटेन्मेंट क्षेत्र हटविण्याचे आदेश गुरुवारी जारी केले. यामुळे परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.ट्रस्ट ले-आऊट परिसरात बाधित रुग्ण आढळून आला होता. परंतु सुदामनगरी, हिलटॉप, पांडराबोडी, संजयनगर, गवळीपुरा, बाजीप्रभूनगर आदी वस्त्यांमध्ये बाधित रुग्ण नसतानाही हे क्षेत्र सील करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने मोलमजुरी करणारे, नोकरदार, व्यावसायिक, दुधाचा व्यवसाय करणारे अडणीत आले होते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाता येत नव्हते. जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली.२३ व २४ मे रोजी आ. ठाकरे यांच्यासह या भागातील नागरिकांनी आंदोलन केले. २५ मे रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देत बाधित रुग्ण नसलेल्या भागातील प्रतिबंध हटविण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विभागीय आयुक्तांना फोन करून आवश्यक त्या सूचना दिल्या. याच वेळी विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत बठक झाली. तीत विभागीय आयुक्तांनी प्रभावित क्षेत्र वगळून इतर भागातील सील हटिवण्याचे आश्वस्त केले होते. तर दुसरीकडे नियमानुसार २८ दिवसपर्यंत सील उघडता येणार नाही, अशी भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली होती. अखेर गुरुवारी मनपा आयुक्तांनी ट्रस्ट ले-आऊट परिसरातील ८० टक्के भागातील प्रतिबंध हटविण्याचे आदेश जारी केले.विधानसभेत लक्षवेधी लावणार : ठाकरेकंटेन्मेंट क्षेत्राच्या नियमानुसार या क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सेवा उपलब्ध केल्या पाहिजे. वास्तविक ट्रस्ट ले-आऊट क्षेत्रात बाधित रुग्ण आढळला होता. हिलटॉप, पांढराबोडी, सुदामनगरी, राजीवनगर, गवळीपुरा, बाजीप्रभूनगर आदी वस्त्यात गरज नसतानाही प्रतिबंध लावून मनपा प्रशासनाने नागरिकांचा मानसिक छळ करून त्यांना वेठीस धरले. यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी लावून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.फुके यांनीही केले आंदोलनपांढराबोडी परिसरातील मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपकार्तील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या परिसरातील निर्बंध हटविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी २५ मे रोजी मनपा आयुक्त मुंढे यांना पत्र पाठवून केली होती. निर्बंध न हटविल्यास अंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर गुरुवारी दुपारी आमदार डॉ. परिणय फुके व नगरसेविका डॉ. परिणीता फुके यांनी हिलटॉप परिसरात आंदोलन करून या भागातील निर्बंध हटविण्याची मागणी केली. आंदोलनात परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी नारेबाजी करीत महापालिकेने रस्ते बंद करण्यासाठी लावलेले टिन व कठडे तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आ. फुके यांनी झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वºहाडे यांना आंदोलनस्थळी बोलावून प्रतिबंध न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अंबाझरी परिसरातील ८० टक्के भाग मुक्त : अखेर मनपा आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र केले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:34 AM
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ८ मे रोजी पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन क्षेत्रातील ट्रस्ट ले-आऊट क्षेत्र कंटेन्मेंट घोषित करण्यात आले होते. २२ मे रोजी प्रतिबंध हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानतंरही प्रतिबंध न हटविल्याने परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निर्बंध हटविण्याची मागणी केली. तर नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनीही महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन मागणी केली होती. अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्रस्ट ले-आऊट भागातील ८० कंटेन्मेंट क्षेत्र हटविण्याचे आदेश गुरुवारी जारी केले.
ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांना मोठा दिलासा