शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मनपात ८० टक्के पदे रिक्त; उद्दिष्ट मात्र पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:57 AM

उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे २.७० कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात याहून अधिक वाढ झाली असती. परंतु ८ ऑक्टोबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उंच इमारतींवर आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्यात आले आहे. ही वसुली सुरू राहिली असती तर हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला मदत झाली असती. उंच इमारतींवर शुल्क आकारण्याचा सुधारित प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.अग्निशमन विभागाचे मुख्य काम नैसर्गिक आपत्ती वा आगीची घटना घडल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान रोखण्याचे आहे. आपली जबाबदारी पार पाडून विभागाने शुल्क वसुलीतही आघाडी घेतली आहे. रिक्त पदे भरून विभागाला बळ देण्याची गरज आहे. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. असे असूनही या विभागातील कर्मचारी व अधिकारी सक्षमतेने काम करीत आहेत.विभागात सशक्त कर्मचाऱ्यांची गरज असते. या विभागातील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आले आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला शुल्क वसुलीतून ११ लाख ७८ हजार ९८२ रुपये, पाणीपुरवठा, विहीर सफाई, फटाके, पर्यावरण शुल्क यातून १ कोटी ५ लाख ९१ हजार ५८४ रुपये, उंच व लहान इमारत निरीक्षण शुल्क, अग्निशमन सेवा शुल्क यातून १ कोटी ५२ लाख २५ हजार ८१६ रुपये उत्पन्न झाले.बचाव कार्यासाठी कर्मचारी नाहीशहरात आठ अग्निशमन स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनवर २४ तास कर्मचारी ड्युटीवर असतात. विभागातील पदे रिक्त होत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. एखादी मोठी घटना घडल्यास बचावासाठी कर्मचारी व वाहन उपलब्ध करताना विभागाला चांगलीच कसरत करावी लागते. सध्या ९० फायरमन कार्यरत आहेत. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधून सज्ज आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याने ते सुरू झालेले नाही. ५६ चालकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून फायरमनचे काम करून घेणे शक्य आहे.सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्ट पूर्तीअग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती वा आग आटोक्यात आणताना कुशल मनुष्यबळाची गरज असते. परंतु पदे रिक्त असल्याने अडचणी येतात. असे असूनही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून प्रयत्न केले जातात. उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक शुल्क वसुली झाली आहे. ही चांगली बाब आहे. क र्मचारी व अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.राजेंद्र उचके,अग्निशमन अधिकारी महापालिका

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी