शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 6:36 AM

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश 

राजेश शेगाेकार नागपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील पोचमपल्लीनजीक तेलंगणा सरकारच्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा एक भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजच्या पुलाचा पाया २१ ऑक्टोबरला रात्री खचल्याने अचानक गोदावरीत विसर्ग करावा लागला. या प्रकल्पाची नॅशनल डॅम सेफ्टी ॲथाॅरटी (NDSA)च्या पथकाने पाहणी करून अहवाल दिला. 

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश धरणासंदर्भात नियोजन, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण तसेच ऑपरेशन आणि देखभाल करण्यात सरकारला अपयश आले आहे, अशा शब्दांत अहवालात फटकारण्यात आले. झालेले नुकसान पाहता आगामी काळात मेडिगड्डा धरणच पुन्हा बांधावे लागणार आहे, असा निष्कर्ष काढला आहे. 

सहा खांबांना गेले तडे मेडिगड्डा बॅरेजच्या सहा खांबांना तडे गेल्यानंतर एनडीएसएच्या सहा सदस्यीय तज्ज्ञांनी बॅरेजला २३ आणि २४ ऑक्टोबरला भेट दिली तसेच तेलंगणाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाहणीनंतर पथकाने ४३ पानांचा अहवाल दिला आहे. 

अहवालात म्हटले की,...nबॅरेजचे १५ ते २१ दरम्यानचे खांब १६ हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या प्रवाहाचा सामना करण्यास सक्षम ठरले नाहीत. nखांब बुडाल्याने फ्लोटिंग स्ट्रक्चर म्हणून केलेले डिझाइन, प्रकल्पाचे नियाेजन  आणि अंमलबजावणीमधील उणिवा उघड करतात.nबॅरेजच्या कमकुवतपणामुळे सर्व ८५ दरवाजे उघडण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे राखीव दहा दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले. 

तपासणी, देखभाल नाही२०१९-२० मध्ये बॅरेज सुरू झाल्यापासून सिमेंट-काँक्रीट ब्लॉक्सची किंवा लॉन्चिंग ऍप्रन्सची तपासणी किंवा देखभाल केली नाही. यामुळे बॅरेज हळूहळू कमकुवत होत आहे. बॅरेजची पूर्णपणे दुरुस्ती होईपर्यंत ते निरुपयोगी आहे. खराब झालेला सातव्या क्रमांकाचा खांब नव्याने बांधणे आवश्यक आहे. तसे करताना इतर खांब काेसळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती म्हणजे धरणाची पुनर्बांधणी करणेच ठरणार असल्याचे अहवालात म्हटले.  

२ मे २०१६पायाभरणी८०,०००कोटी खर्च१६.१७टीएमसी क्षमता८५दरवाजे७,५०,०००हेक्टर नवीनसिंचन क्षमता

टॅग्स :nagpurनागपूरTelanganaतेलंगणाDamधरण