नागपूर : आशिया खंडातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजला स्वत:ची इमारतच नाही. आजही या कॉलेजचे वर्ग नर्सिंग होस्टेलमध्येच भरतात. तब्बल ५० वर्षानंतर या इमारतीसाठी आता विशेष प्रयत्न झाल्याने सरकारने बांधकामासाठी ५० कोटींना मंजुरी दिली. परंतु प्रस्तावित जागेवरील ८० झाडे अडसर ठरल्याने बांधकाम थांबले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेज व हॉस्टेलचे बांधकाम १९५८ मध्ये सुरू झाले. कॉलेजची इमारत बांधण्यापूर्वी नर्सिंग होस्टेलचे बांधकाम झाले. त्यानंतर होस्टेलसमोरील मोकळ्या भूखंडावर नर्सिंग कॉलेजची इमारत होणार होती. परंतु कॉलेजच्या बांधकामासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. २००६ पासून बीएस.सी नर्सिंग सुरू झाले. परंतु त्याचे वर्गही याच होस्टेलमध्ये सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयही वसतिगृहात होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांसाठी गैरसोयीचे व्हायची. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी नर्सिंग कॉलेजच्या बांधकामासाठी प्रयत्न सुरू केले. जुलै महिन्यात जम्मू-काश्मीरमधील एका विद्यार्थिनीच्या अचानक मृत्यूने नर्सिंग कॉलेजमधील गैरसोयींचा पाढा वाचण्यात आला. परिणामी, सरकारनेही याची दखल घेत कॉलेजच्या बांधकामासाठी ५० कोटी ६५ लाख ७१ हजार ८५३ रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली. -२९०० स्केअर मीटरमध्ये होणार बांधकामतळमजल्यासह तीन मजल्याचे नर्सिंग कॉलेजचे बांधकाम २९०० स्केअर मीटरमध्ये होणार आहे. ३०० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेचे हे कॉलेज असणार आहे. तळमजल्यावर मीटिंग हॉल, कॅन्टिन, प्राचार्य, उपप्राचार्य यांचे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, पहिल्या मजल्यावर लेक्चर हॉल, स्टाफ रुम, मेडिकल सर्जिकल लॅब, नर्सिंग लॅब, सेमीनार हॉल, दुसºया मजल्यावर लेक्चर हॉल सोबतच गायनिक व पेडियाट्रिक लॅब, न्युट्रिशियन लॅब, तिसºया मजल्यावर कॉम्प्युटर लॅब, संग्रहालय आदी असणार आहे. -मनपाच्या मंजुरीची प्रतिक्षानर्सिंग कॉलेजच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून बांधकामाचे कंत्राट साळवे कंपनीला देण्यात आले आहे. नर्सिंग कॉलेच्या प्रस्तावित जागेवर असलेली ८० झाडे कापण्यासाठी नुकतेच मनपाच्या उद्यान विभागाने पाहणी करून पंचनामा केला. झाडे कापण्याचा मंजुरीची प्रतिक्षा आहे. ती मिळताच लगेच बांधकामाला सुरूवात केली जाईल, असे बांधकाम विभागातील अधिकाºयाचे म्हणणे आहे.
-दोन वर्षात नव्या इमारतीत नर्सिंग कॉलेज मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजला स्वतंत्र इमारत असावी यााठी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश मिळाले. बांधकामासाठी लागणाºया निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. पुढील दोन वर्षात नव्या इमारतीत हे नर्सिंग कॉलेज सुरू होईल. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासही मदत होईल.-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल