वाडी : स्थानिक श्री विश्वनाथ बाबा शिक्षण संस्था व मातादिन जयस्वाल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने वाडी शहरात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ८० तरुणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हा परिषद सभापती भारती पाटील, जिल्हा परिषद सदस्य ममता धोपटे, दिनेश बंग, आयोजक राजेश जयस्वाल, विश्वनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामकुमार जयस्वाल, डॉ. गुलाब बिडवाईक, संतोष नरवाडे, श्याम मंडपे, संतोष केचे, हर्षल काकडे, वसंतराव इखनकर, शत्रुघ्न परिहार, शैलेश थोराने, प्राचार्या अनिता टोहरे, प्रा. सुरेंद्र मोरे, डॉ. संदीप महाकाळकर उपस्थित हाेते. या शिबरात ८० तरुणांनी रक्तदान केले. संचालन राजेश बिडवाईक यांनी केले तर सुधाकर लडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला निळकंठ रासेकर, माणिकराव गोमकार, गणपत रागीट, सुनील मिश्रा, तेजराव निघोट, दिनेश उईके, नरेंद्र राऊत, योगेश चरडे, संदीप उमरेडकर, सचिन गणवीर यांच्यासह नागरिकांनी हजेरी लावली हाेती. यशस्विसाठी जुगलकिशोर जयस्वाल, बंडू जयस्वाल, प्रतिभा पांडे, नंदकिशोर जयस्वाल, संदीप उपासे, अशोक डोंगरकर, संदीप भदभुजे, बलदेव राठोड, विजय जयस्वाल, दिलीप बागडे, उमेश डडमल, सचिन पुणेवार, जयंत गंडोले, सतीश जयस्वाल, जुनेद अहमद, राजीव वालदे, धनराज थोटे यांनी सहकार्य केले.