शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
2
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
4
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
5
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
7
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
8
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
9
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
10
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
11
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
12
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
13
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
14
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
15
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
16
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
17
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
18
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
19
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
20
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर

By गणेश हुड | Published: June 10, 2023 5:32 PM

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सप्टेंबरपर्यंतची चिंता मिटली!

नागपूर : जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. विदर्भातील ११ जिल्ह्याकरिता भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) सप्टेंबर पर्यंतचा तांदळाचा ८२,२७३ मेट्रिक टन  कोटा मंजूर झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतच्या मध्यान्ह भोजन आहाराची चिंता मिटली आहे.

इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना या शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी आवश्यक असलेला तांदूळ हा प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ पर्यंत नागपूरसह विदर्भातील  ११ जिल्ह्यांकरिता तांदूळ मंजूर झाला आहे. त्यापैकी ४०,००९.३६ मेट्रिक टन शाळांना वितरीतही झाला आहे. ४२४६३.६४ मेट्रिक टन तांदूळाचे लवकरच वितरण होणार आहे. त्यामुळे येत्या ३० जून २०२३ पासून सुरु होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून शापोआ चे वितरण होणार आहे.

धान्य अर्थात तांदूळ देण्याची जबाबदारी ही एफसीआयवर निश्चित केली असून, त्याचा शाळांमध्ये पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराच्या माध्यमातून करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यात शापोआ अंतर्गत २७४९ शाळा येत असून, येथे १ ते ८ पर्यंतचे सुमारे ३ लाख ५ हजारांवर लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आहेत. तर मध्यान्ह भोजन शिजविण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर धान्यादी मालाच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्ह्याकरिता श्रीकृष्ण असोसिएट्स यांच्याकडे आले. ते विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाकरिता शाळांना खाद्य तेल, तिखट, डाळी, मसाले, मीठ आदींचा पुरवठा करत असतात. एफसीआयकडून मंजूर झालेल्या तांदूळ हा १ ते ५ च्या विद्यार्थ्याला प्रति दिन प्रती विद्यार्थ्याकरिता १०० ग्राम आणि ६ ते ८ च्या विद्यार्थ्याकरिता १५० ग्राम याप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

इंधन, भाजीपाला खरेदीची जबाबदारी शाळांवर

शाळा स्तरावर भाजीपाला व इंधनाची खरेदीची जबाबदारी असते. यासाठी शाळांना प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. शाळांना १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता प्रती दिन प्रती विद्यार्थ्याकरिता इंधन भाजीपाल्याचे २.०८ रुपये तर ६ ते ८ च्या विद्यार्थ्यासाठी ३.११ रुपये मिळतात. यामध्ये शाळांना १ ते ५ च्या प्रती दिन प्रती विद्यार्थ्याला ५० ग्राम भाजीपाला व १ ते ८ साठी ७५ ग्राम भाजीपाल्याचा खर्च मिळतो.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थीSchoolशाळाfoodअन्नnagpurनागपूर