लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतातील बौद्ध धम्म आज जगभरात पसरला आहे. यात सम्राट अशोकाचा सिंहाचा वाटा आहे. सम्राट अशोकाने देशभरात ८४ बौद्ध स्तुप आणि विहारे बांधल्याचा इतिहास आहे. हाच धागा पकडून व्हिएतनामने बौद्ध धम्म गतिमान करण्याच्या उद्देशाने भारतात ८४ हजार बुद्ध मूर्ती दान देण्याचा निर्णय घेतला आहे. या बुद्ध मूर्ती देशभरात बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था व व्यक्तींना प्रदान करण्यात येणार आहेत.व्हिएतनाम येथील ली थू हिनई यांच्यातर्फे या बुद्ध मूर्ती प्राप्त झाल्या आहेत. अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरच्या माध्यमातून या बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात येणार आहेत. याअंतर्गत नागपुरात १११ बुद्ध मूर्ती दान दिल्या जात असून, येत्या ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रविभवन येथे भगवान बुद्ध मूर्ती दान समारोह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत भाऊ लोखंडे अध्यक्षस्थानी राहतील. आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सिने अभिनेते गगन मलिक, पुष्पा घोडके, वीणा गायकवाड, वर्षा धारगावे, संस्थेचे पदाधिकारी नितीन गजभिये प्रामुख्याने उपस्थित राहतील.दिल्ली, मुंबई व औरंगाबाद शहरातही प्रत्येकी १०० बुद्ध मूर्तीदेशभरात ८४ हजार बुद्ध मूर्ती दान देण्यात येणार आहेत. याअंतर्गत देशातील प्रत्येक शहरामधील संस्था व कार्यकर्त्यांना या मूर्ती प्रदान केल्या जातील. नागपूरसह दिल्ली, मुंबई व औरंगाबाद शहरातही प्रत्येकी १०० बुद्ध मूर्ती दान देण्यात येणार आहेत.
भारताला व्हिएतनामतर्फे ८४ हजार बुद्ध मूर्तीचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 7:57 PM
सम्राट अशोकाने देशभरात ८४ बौद्ध स्तुप आणि विहारे बांधल्याचा इतिहास आहे. हाच धागा पकडून व्हिएतनामने बौद्ध धम्म गतिमान करण्याच्या उद्देशाने भारतात ८४ हजार बुद्ध मूर्ती दान देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देनागपूरला मिळणार १११ बुद्ध मूर्ती