शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूर परिमंडळात वर्षभरात ८४ हजारावर नवीन वीज जोडण्या

By आनंद डेकाटे | Published: January 13, 2024 4:12 PM

नागपूर परिमंडळात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.

नागपूर :नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या वर्षभरात सर्व वर्गवारीत ८४,२३७ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल ६२,८६३ घरगुती आणि ७,२०३ कृषी जोडण्यांचा समावेश आहे.

नागपूर परिमंडळात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. महावितरण'च्या नागपूर परिमंडलामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या गेल्या, मागिल वर्षी जानेवारीपासून नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आल्या असून २०२३ मध्ये तब्बल ८४,२३७ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी 'महावितरण'च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला आहे. नागपूर परिमंडल' अंतर्गत यापूर्वी दरमहा ५ ते ६ हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या वर्षी दरमहा सरासरी ७ हजारावर वर गेला.

गेल्या वर्षी ८४ हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृती मानकांप्रमाणे निश्चित कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

वर्गवारी नुसार नवीन वीज जोड

वर्गवारी - नागपूर ग्रामीण मंडल - नागपूर शहर मंडल - वर्धा मंडल - नागपूर परिमंडल एकूण

घरगुती - १६,९७८ - ३७,१३५ - ८,७५० - ६२,८६३

वाणिज्यिक - १,९४४ - ६,८१०- १,९०२- १०,६५६

औद्योगिक - ४२८- - ६४८- २१९- १,२९५

कृषी - ३५५१ - २३२, ३४२० - ७,२०३

इतर - ७०९ - १०८७- ४२४ - २,२२०-----------------------------------एकूण २३,६१० - ४५,९१२- १४,७१५- ८४,२३७

टॅग्स :nagpurनागपूरmahavitaranमहावितरण