जिल्हाधिकारी कार्यालयाची कारवाई नागपूर : अॅन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६१ लोकांकडून ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शनिवारी दिली. अवैधपणे रेतीचे उत्खनन व वाहतूक तसेच दगड आदी मायनिंग संदर्भात शनिवारी प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक आठ प्रकरणे सावनेर तहसीलमध्ये नोंदविण्यात आली असून ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवापूर तालुक्यात तीन प्रकरणात १ लाख २ हजार, पारशिवनीत १ लाख ४३ हजार ७००, उमरेड १ लाख ६७ हजार ६०० तसेच इतर जिल्ह्यातही ६१ प्रकरणांमध्ये ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैधपणे रेती व दगड वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) जिल्ह्यात १ हजार ११८ प्रकरणात कारवाई अवैधपणे उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध १ एप्रिलपासून १ हजार ११८ प्रकरणात ४ कोटी ६९ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम शासन जमा करण्यात येऊन १३४ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
अवैध उत्खननातून ८.४४ लाख दंड वसूल
By admin | Published: March 19, 2017 3:00 AM