लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य जलद गतीने सुरू असून रिच-४ या मार्गावर सुमारे १६ किमीमध्ये (अप अॅण्ड डाऊन लाईन) १० किमी मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील बांधकामादरम्यान लावण्यात आलेले बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत.या मार्गावर महामेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा पूल आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत तयार करीत आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. तसेच मेट्रोच्या या मार्गावर ८७ टक्के व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे.सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे. यामध्ये कॉटन मार्केट नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांसाठी सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. या मार्गालगत गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. सेंट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने काळजी घेतली. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाल्यावर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठात जाणे सोईचे होईल.
रिच-४ व्हायाडक्टचे ८७ टक्के कार्य पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:33 AM
महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य जलद गतीने सुरू असून रिच-४ या मार्गावर सुमारे १६ किमीमध्ये (अप अॅण्ड डाऊन लाईन) १० किमी मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील बांधकामादरम्यान लावण्यात आलेले बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे मेट्रोच्या १० किमी मार्गावर बसविले रुळ : बॅरिकेड्स हटविले