लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमी परिसरात यावर्षी सुमारे ९०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यातील साधारण १०० स्टॉल्स पुस्तकांचे तर उर्वरित स्टॉल्स सामाजिक संघटनांचे आहेत. स्टॉल्समधून भोजनदान, फळे, फराळ, पाण्याचे वितरण, आरोग्याची तपासणी व औषध वितरण, विमा काढणे, धर्मदाय इस्पितळांची माहिती देणारे व कायद्याविषयक सल्ले देणारे स्टॉल्सचा समावेश आहे. शुक्रवारी यातील बहुसंख्य स्टॉल्स आंबेडकरी अनुयायांसाठी खुले झाले होते.मायावती सार्वजनिक महिला उपासिका संस्थाधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपºयातून येणाºया भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था गेल्या ४३ वर्षांपासून कामठी येथील मायावती सार्वजनिक उपासिका महिला संघटना करीत आहे. दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी उपाशी जाऊ नये, त्यांना एकवेळचे तरी जेवण मिळावे या विचाराने झपाटलेल्या ७२ वर्षांच्या वंचळाबार्ई गजभिये यांनी या भोजनदानाला सुरुवात केली. आज त्या हयात नसल्या तरी त्यांचे हे कार्य संस्थेच्या अध्यक्ष कविता रामटेके, सचिव नीलू मेश्राम, विजया ढेंगरे, लक्ष्मी गजभिये, उर्मिला उके मार्गदर्शक अनिल मेश्राम मोठ्या परिश्रमाने समोर नेत आहे. पुढील तीन दिवसांत सुमारे २५ हजारांवर लोकांच्या भोजनाची व्यवस्था या संस्थेने केली असून सर्व सदस्य व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.वीज कर्मचाºयांकडून भोजनदानदरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीक्षाभूमीवर येणाºयांची भूक भागविण्याची जबाबदारी वीज कर्मचाºयांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. १ आॅक्टोबर रोजी माता कचेरी परिसरात भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ८ वाजता महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात होईल. भोजनदानाचे हे १५वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता रफिक शेख, किशोर मेश्राम, अरविंद भादीकर, जिजोबा पारधी, दिलीप घुगल आदींसह वीज विभागातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
९०० सामाजिक संघटनाची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:38 AM
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमी परिसरात यावर्षी सुमारे ९०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यातील साधारण १०० स्टॉल्स पुस्तकांचे तर उर्वरित स्टॉल्स सामाजिक संघटनांचे आहेत.
ठळक मुद्देमायावती सार्वजनिक महिला उपासिका संस्था