शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

गारपीट नुकसान भरपाईसाठी मिळाले ९ कोटी

By आनंद डेकाटे | Published: May 05, 2023 4:14 PM

Nagpur News मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी जिल्ह्याला ९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

आनंद डेकाटे नागपूर : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी जिल्ह्याला ९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. संप काळातही महसूल, कृषी विभागाच्या कर्चमाऱ्यांनी पंचनामे केले. प्राथमिक सर्वेक्षणात सात हजारांवर पिकांचे नुकसान झाल्याचा समोर आले. अंतिम अहवालात हा आकडा ४४४१ हेक्टर होता. दरम्यानच्या काळात शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली. खरीप हंगामात अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला. काहीसे पीक हातात आले. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

रब्बीत चांगले पीक होण्याची अपेक्ष होती. परंतु अवकाळ पाऊस व गारपीटीने त्यावर पाणी फेरले. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. मार्च महिन्यात ४ हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मार्च महिन्यात झालेल्या नुकसानासाठी मदत देण्यासाठी १० एप्रिला शासनाने आदेश काढला. परंतु यात नागपूर जिल्ह्याचा समावेश नव्हता. याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. आता शासनाने नुकसानापोटी ९ कोटी ७ लाख ४५ हजार ७०० रुपयांची निधी मंजूर केला.असा मिळणार निधीतालुका - एकुण बाधित क्षेत्र - बाधित शेतकरी - मदत रक्कमकाटोल - १०३९ - १४४३ - २,२७,३९,५००ना. ग्रामीण - १ - २ - ८५००पारशिवनी - १२ - २१ - २,१५,०००कळमेश्वर - २९९०.३५ - ३४८४ - ६,१०,९६,४७५मौदा - ५०.१० - ८८ - ८६१६००रामटेक - २४१.३५ - ११७- ३८,७९,८२५सावनेर - १०७ - ११७ - १९, ४४, ८००

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार