शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

राज्यात ९० टक्के लॉटरी व्यवसाय ठप्प : १० लाख रोजगार पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 12:51 AM

लॉटरी उद्योगावर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या सदोष कररचनेमुळे लॉटरी उद्योग पूर्णत: बंद होण्याच्या मार्गावर आहे. पंजाब व महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय ९० टक्के ठप्प झाला असून जवळपास १० लाख रोजगार पणाला लागले असल्याची भीती लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलॉटरी उद्योगात जीएसटी सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉटरी उद्योगावर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या सदोष कररचनेमुळे लॉटरी उद्योग पूर्णत: बंद होण्याच्या मार्गावर आहे. पंजाब व महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय ९० टक्के ठप्प झाला असून जवळपास १० लाख रोजगार पणाला लागले असल्याची भीती लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. हा व्यवसाय वाचविण्यासाठी जीएसटी करप्रणालीत सुधारणा करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.असोसिएशनच्या स्नेहल शाह यांनी डबघाईस आलेल्या या व्यवसायाबाबत चिंता व्यक्त करीत सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली. जीएसटीच्या रचनेत लॉटरी तिकिटांच्या दर्शनी कि मतीवर कर आकारणी करून तिचा बक्षिसाच्या रकमेत समावेश करणे, हा लॉटरी उद्योगाचा प्रमुख आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनी कि मतीवर जीएसटी आकारणे संकल्पनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय व्हॅट क्षेत्रात बक्षिसांची रक्कम जीएसटीमध्ये अंतर्भूत केली जात नाही. भारतीय व्हॅट प्रणालीमध्येही जिंकलेल्या बक्षिसांच्या आधारावर कधीही कर लावण्यात आला नव्हता व त्याला कर आकारणीपासून अलिप्त ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियामध्ये असलेले याबाबतचे नियम लक्ष देण्यायोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात मात्र दर्शनी मूल्यांवर आधारित कर रचनेमुळे लॉटरी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे लॉटरी व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यामुळे कमी बक्षीस वेतन मिळते व व्यवसायावर परिणाम होतो व पर्यायाने महसूल वसुलीवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अव्यवहार्य मूल्यांकन पद्धतीमुळे अनावश्यक दावे व खटल्यांमध्ये वाढ झाली आहे. कर वसुलीतही आतापर्यंतचा सर्वात नीचांक गाठला आहे. नवीन अप्रत्यक्ष कररचनेच्या अंमलबजावणीपासून सरकारला वर्षाला ६९०० कोेटी इतका जीएसटी तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे व्हॅट असलेल्या काळाच्या तुलनेत हा व्यवसाय ९० टक्के ठप्प पडल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच गोवा येथे झालेल्या ३७ व्या जीएसटी परिषदेत आर्थिकदृष्ट्या आजारी असलेल्या हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, विमा, निर्यात, जाहिरात आदी क्षेत्रांना जीएसटी परिषदेच्या माध्यमातून सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरीकडे भारत सरकारला जवळपास १० अब्ज डॉलर्सचा कर महसूल म्हणून देणाऱ्या व लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या लॉटरी उद्योगाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका असोसिएशनने केली आहे.हा प्रश्न निकाली काढण्यासाठी उद्योगातील सदस्य वारंवार सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी करीत आहेत. राज्य सरकारने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाचा अभ्यास करून शिफारशी देण्यासाठी एका मंत्रिगटाची समिती स्थापन केली होती. मात्र आठ महिने लोटूनही यावर मंत्रिगटात एकमत होऊ शकले नाही. आतापर्यंत जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. सरकारने गंभीरपणे याकडे लक्ष दिले नाही तर नजिकच्या काळात हा लॉटरी उद्योग पूर्णपणे बंद होण्याची भीती स्नेहल शाह यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर