लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने बंदी असलेल्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी विविध भागांतून ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. मूर्ती विक्रेत्यांकडून १लाख २१ हजार रुपये दंड वसूल केला. पीओपी मूर्ती विक्री करणारी दोन दुकाने हटविण्यात आली.
मंगळवारी उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर आणि मंगळवारी या पाच झोनमधील १०६ दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील ९० पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. हनुमाननगर झोन पथकाने ५० रुपये दंड वसूल केला. २५ दुकानांची तपासणी करून ६० पीओपी मूर्ती जप्त केल्या. धरमपेठ झोनमध्ये ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या पथकाला पीओपी मूर्तींची ओळखण्यासाठी मदत केली. १५ दुकानांची तपासणी करून २७ मूर्ती जप्त करण्यात आल्या. दोन दुकानांना तात्काळ हटविण्यात आले. ३० हजार रुपये दंड वसूल केला. ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. मंगळवारी झोनमधील १५ दुकानांची तपासणी केली. ३ मूर्ती जप्त करून १७ हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगर झोनमध्ये ३६ दुकानांवर कारवाई करून १४ हजार रुपये दंड तर लक्ष्मीनगर झोनमधील १५ दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात झोन पथकांनी ही कारवाई केली.
तसेच उपद्रव शोध पथकाने एका प्रतिष्ठानावर कारवाई करुन ५ हजार रुपये दंड वसूल केला. पथकाने ५० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
...