शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उपराजधानीतील पाण्याचे ९६ टक्के नमुने पिण्यायोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:41 PM

नागपूर महापालिकेद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही नमुने घेतले असता, ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देशुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठापाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील बहुतांश महापालिकांना दूषित पाण्याची समस्या भेडसावत असताना, नागपूर महापालिका शहरभरात स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे. महापालिकेद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही नमुने घेतले असता, ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले. देशात सर्वात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याचा दावा होत आहे.महापालिकेतर्फे राबविण्यात येणाºया २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या व शहरातील सर्व नळजोडण्या, या दूषित पाण्याचे प्रमुख कारण होते. त्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मनपा व ओसीडब्ल्यू यांनी आतापर्यंत ६८७ किमी जलवाहिन्या व २.३१ लाख नळजोडण्या बदलल्या आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा धोका कमी झाला आहे. मनपाने पाण्याच्या गुणवत्तेची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र चमू तयार केली आहे. ही चमू जलकुंभ व संपूर्ण वितरण व्यवस्थेत क्लोरिनची पातळी राखण्याचे काम करते. याच चमूद्वारे शहरातील विविध ठिकाणांहून दर महिन्याला १५०० पाण्याचे नमुने गोळा करून, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेत तपासण्यात येणाºया पाण्याच्या नमुन्यात ९५ ते ९९ टक्के नमुने पिण्यायोग्य असतात. जेथील नमुने पिण्यायोग्य नाही, तिथे आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. जलकुंभ हे पाणीपुरवठा यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. मनपाने वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत आहे.हजारोंच्या संख्येने अवैध नळजोडण्याशहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या आहेत. बेकायदेशीर पद्धतीने केलेल्या नळजोडण्या सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जलवाहिन्यांना क्षति पोहचवीत आहे. त्यातून दूषित पाण्याचा धोका आहे. महसुलाचेही नुकसान होत आहे. मनपाने अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जलवाहिन्यांवर असलेले अतिक्रमणसुद्धा एक आवाहन आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांवर रस्ते, इमारती व इतर बांधकाम करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Waterपाणी