माैदा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी काेराेना प्रतिबंधक लस घेणे, हा प्रभावी उपाय आहे. याबाबत जनजागृती व नागरिकांना प्रेरित करीत चिरव्हा (ता. माैदा) येथे ४५ वर्षावरील ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित पाच टक्के लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती सरपंच सुशीला तिजारे यांनी दिली.
गावातील प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. या कार्यात आराेग्य, महसूल व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. परिणामी, येथील ४५ वर्षावरील १०० नागरिकांना काेराेनाची पहिली तर ९५ टक्के नागरिकांना दुसरी लस देण्यात आली. गावाची लाेकसंख्या २,७९७ असून, यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ही ७४७ एवढी आहे. यातील ७१३ नागरिकांचे लसीकरण (दाेन्ही डाेस) पूर्ण झाले असून, उर्वरित ३४ नागरिकांना लवकरच दुसरा डाेस देऊन १०० टक्के लसीकरण करण्यात येणार असल्याचा विश्वास सरपंच सुशीला तिजारे यांनी व्यक्त केला. नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करण्यासाठी सरपंच सुशीला तिजारे, उपसरपंच रोशन ठोंबरे, ग्रामसेवक लीलाधर बारंगे, तलाठी एन. डी. फुलझेले, मुख्याध्यापक रमेश किरपान, ग्रामपंचायत कर्मचारी सदाशिव सपाटे, लक्ष्मण बांते, आशासेविका बुराडे, कनोजे व डुंबरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.