शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

९८.८ टक्के लोकांचे चिनी वस्तूंच्या बहिष्काराला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 8:12 PM

संपूर्ण देशातील नागरिक चीनविरोधात एकजुटीने उभे आहेत आणि कोणत्याही स्थितीत आता चीनला धडा शिकवावा, अशी त्यांची इच्छा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील विविध वर्गातील लोकांमध्ये अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात ९८.८ टक्के लोकांनी चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे समर्थन केले. हे सर्वेक्षण कन्फेडेरशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट)ने १९ ते २७ जूनदरम्यान देशाच्या विविध राज्यांमध्ये केले. ९,७३५ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेऊन आपले मत जाहीर केले.सर्वेक्षणात चीनसोबत सध्या असलेल्या परिस्थितीवर संबंधित नऊ प्रश्न विचारण्यात आले आणि प्रश्नांच्या उत्तराची टक्केवारी ९० पेक्षा जास्त होती. यावरून हे स्पष्ट होते की, या मुद्यावर संपूर्ण देशातील नागरिक चीनविरोधात एकजुटीने उभे आहेत आणि कोणत्याही स्थितीत आता चीनला धडा शिकवावा, अशी त्यांची इच्छा आहे.‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, नऊ दिवसांच्या ऑनलाईन सर्वेक्षणात व्यापारी, लघु उद्योग, शेतकरी, हॉकर्स, ग्राहक, स्वयंउद्योजक, महिला उद्योजिका, गृहिणी, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांसह अनेक वर्गाने उत्स्फूर्तपणे भाग घेतला. कॅटने देशातील सर्व राज्यातील जवळपास ११ हजार लोकांना सर्वेक्षण फॉर्म पाठविले. त्यातून ९,७३५ लोकांनी आपले मत मांडले. सर्वेक्षणातील प्रश्नावलीमध्ये चीनने भारतीय सैन्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची आहे का, भारतीय सैन्यातील २० सैनिकांच्या मृत्यूने दु:खी आहात काय, या कारवाईबाबत चीनला धडा शिकवायचा काय, तुम्ही भारतीय सैनिकांसोबत उभे आहात काय, चिनी वस्तूंचा बहिष्कार करणार काय, चिनी वस्तूंची खरेदी व विक्री न करण्याची शपथ घेणार काय, अभिनेते व क्रिकेटर यांनी चिनी वस्तूंची जाहिरात करावी वा करू नये, चिनी कंपन्यांसोबतचे करार रद्द करावेत काय, चिनी कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये गुंतविलेला पैसा चीनने परत न्यावा, आदींचा समावेश होता.

सर्व वर्गातील नागरिकांनी सरासरी ९८.८ टक्के चिनी वस्तू आणि चीनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. नऊ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणाचे लोकांनी स्वागत केले आहे. कॅट संपूर्ण देशात स्वदेशी वस्तूंचा अवलंब आणि चिनी वस्तूंचा बहिष्कार ही मोहीम राबवीत आहे. दिवाळीत चिनी वस्तूंची विक्री न करण्याची शपथ देशातील किरकोळ व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

 

टॅग्स :chinaचीन