शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ९५.४८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 9:43 PM

जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) जिल्ह्यातील मोठे, लहान नागरी तसेच संक्रमणात्मक मतदार संघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ९५.४९ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देउमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला१९ जागांसाठी मतदानभाजपाचे सहा सदस्य अविरोध

आॅनलाईन लोकमतनागपूर: जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) जिल्ह्यातील मोठे, लहान नागरी तसेच संक्रमणात्मक मतदार संघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ९५.४९ टक्के मतदान झाले.डीपीसीच्या ४० जागांपैकी २५ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ यापैकी सहा सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित १९ जागासाठी मतदान घेण्यात आले. आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे़ यासोबतच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.डीपीसीवर ४० सदस्यांची महानगरपालिका, नगरपालिका-नगरपंचायत व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड केली जाते. जिल्हा नियोजन समितीवर मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र अर्थात महापालिकेतून २० सदस्य निवडले जातात़ तर नगरपंचायत क्षेत्रातून १, नगर परिषद क्षेत्रातून ४ सदस्य निवडले जातात़ जिल्हा परिषदेतून १५ सदस्यांची निवड केली जाते़ परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक व्हायची असल्याने या १५ जागा वगळून ही निवडणूक घेण्यात आली़ डीपीसीच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा स्थानिक संस्था बरखास्त होण्यापर्यंत असतो. जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन आणि त्याला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हा नियोजन समितीला असतात़ जिल्ह्याच्या विकासाचा निधी नियोजन समितीमार्फत खर्च होतो़मतदानाची टक्केवारी ९५़४८ टक्केमहादुला (१७),मौदा (१७),कुही (१७),भिवापूर (१४), हिंगणा (१७) या चार नगर पंचायतींमधील सदस्यसंख्या ८२ आहे़ यातील ८१ सदस्यांनी मतदानाचा हक्का बजावला़ तर, कामठी नगर परिषद (३३), उमरेड (२६),काटोल (२४),नरखेड (१८),मोहाड (१७),रामटेक (१८),कन्हान (१७),सावनेर (२१),कळमेश्वर (१८), खापा (१८), मोहपा (१८) वाडी (२६) या नगर परिषदांची एकूण सदस्य संख्या २५२ इतकी आहे़ यातील २४५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला़ महानगरपालिकेतील १५१ सदस्यांपैकी १३९ सदस्यांनी मतदान केले़ मतदानाची टक्केवारी ९५़४८ टक्के इतकी आहे़ नगर पंचायतीच्या ८२ सदस्यांपैकी ८१ सदस्यांनी मतदान केले.रिंगणातील उमेदवारलहान नागरी क्षेत्र - नगर परिषद : सिंधू धनपाळ (कळमेश्वर), विजयालक्ष्मी भदोरिया (उमरेड), मनोहर पाठक (कन्हान, पारशिवनी), काशीनाथ प्रधान (कामठी), योगिता इटनकर (उमरेड), कल्पना कळंबे (मोवाड), वर्षा गजभिये (खापा, ता़ सावनेर), नरेश बर्वे (इंदोरानगर, कन्हान)संक्रमणात्मक क्षेत्र - नगर पंचायत : संदीप खडसंग (भिवापूर), गुणवंत चामाटे (हिंगणा), राजकुमार सोमनाथे (मौदा)मोठे नागरी मतदारसंघ - महापालिका : स्वाती आखतकर, जिशान मुमताज अन्सारी, प्रगती पाटील, स्नेहल बिहारे, विशाखा मोहोड, जगदीश ग्वालबन्शी, हरीश दिकोंडवार, बाल्या बोरकर, जुल्फेकार भुट्टो, रवींद्र भोयर, बंटी शेळके, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, कमलेश चौधरी, संजय बालपांडे, नितीन साठवणे, सुनील हिरणावर,आशा उईके, यशश्री नंदनवार, निरंजना पाटील, वंदना भगत, भावना लोणारे.भाजपाचे सहा सदस्य अविरोधजिल्हा नियोजन समितीवर महापालिकेतून निवडून द्यावयाच्या २० जागांपैकी भाजपाचे सहा सदस्य अविरोध निवडून आले होते़ एकूण ३० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सरला नायक व शिल्पा धोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते़ ज्या गटांमध्ये काँंग्रेसने किंवा अन्य कोणत्याही पक्षाने अर्ज सादर केले नव्हते त्या गटातून भाजपाचे सहा नगरसेवक अविरोध विजयी झाले आहेत. यात धर्मपाल मेश्राम, विजय चुटुले (अनुसूचित जाती), पल्लवी शामकुळे, मनीषा धावडे, वंदना यंगटवार (इतर मागास प्रवर्ग महिला), गोपीचंद कुमरे (अनुसूचित जमाती) आदींचा समावेश आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक