- निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नासा’च्या माेहिमेत गेलेल्या सुनीता विल्यम्स १०० हून अधिक दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळवीर काय खात-पीत असतील, याचे सर्वांनाच कुतूहल आहे. स्पेस शटलमध्ये अन्न-पाण्याचा मुबलक साठा नेणे शक्य नाही. अशा स्थितीत अंतराळवीरांना पाणीपुरवठा करणारी ‘ब्रिफकेस’ व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केली आहे. याद्वारे मानवी मूत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर हाेईल व ते अंतराळवीरांना पिण्यास वापरता येईल.
कोणी केले संशोधन?nव्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डाॅ. श्रीराम साेनवणे यांच्या नेतृत्वात सुरतच्या एस. व्हीएनआयटीचे प्राध्यापक डाॅ. अलका मुंगरे व डाॅ. अरविंद मुंगरे यांनी ‘नॅनाे मेम्ब्रेन टेक्नॉलाॅजी’चा उपयाेग करून ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रियेने मानवी मुत्राचे शुद्ध पाण्यात रूपांतर करणारे तंत्र विकसित केले आहे. nअंतराळवीरांनी लघुशंका केली की ब्रिफकेसमध्ये ‘मेम्ब्रेन डिस्टिलेशन’ प्रक्रिया हाेऊन शुद्ध पाणी बाहेर पडेल. एक लिटर मूत्रातून ७०० मिली शुद्ध पाणी मिळेल.
पाणी पिण्यायाेग्य करण्याचे काम : डाॅ. साेनवणे यांच्या टीमचे समुद्राचे खारे पाणी कमी खर्चात पिण्यायाेग्य कसे करता येईल, यावर संशाेधन सुरू असून लवकरच त्याची घाेषणा हाेईल, असा विश्वास त्यांनी दिला.
उपयाेगी तंत्रज्ञानडाॅ. श्रीराम साेनवणे यांनी सांगितले, ‘नॅनाे मेम्ब्रेन टेक्नाॅलाॅजी’ बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालयात अत्यंत उपयाेगी पडणारी आहे. संशाेधकांनी हा प्रयाेग यशस्वी करून तसा प्रस्ताव दिला आहे.
शेतीसाठी खतया तंत्रज्ञानाने अमेरिकन मानकावर शुद्ध ठरलेले पाणी तर मिळेलच; पण त्यातून निघणाऱ्या वेस्टमधून शेतीत खतही मिळेल. पीएच-७.५, पीएच-८ व पीएच-९.५ असलेले फाॅस्फेट मिळते, जे शेतीसाठी उपयुक्त ठरते.