शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

फ्लॅटविक्रीच्या नावाखाली बनावट मालकाचा अकोल्यातील व्यापाऱ्याला एक कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Published: August 02, 2023 5:33 PM

रिॲलिटी फर्मच्या प्रोप्रायटरविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : जमिनीचा मालक असल्याची बतावणी करत ग्राहकाला फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने अकोल्यातील व्यापाऱ्याला तब्बल एक कोटींचा गंडा घालण्यात आला. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

संतोष जुगलकिशोर लाहोटी (४५, नवरंग पार्क, अकोला) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जी.बी.रिएलटर्सचा प्रोप्रायटर संतोषकुमार नंदकुमार गंदेवार (४२, श्रीनगर, अजनी) याने लाहोटी यांना छत्रपती चौकातील ३,३८० चौरस मीटर जागेचा मालक असल्याचे सांगत तेथे अपार्टमेंट बांधत असल्याचे सांगितले. तेथील सी.एस.टी.अपार्टमेंटमध्ये नवव्या माळ्यावर १९०० चौरस फूट जागेत फ्लॅट देण्याचा दावा त्याने केला. त्याच्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर २०१७ साली लाहोटी यांनी १.३० कोटींची गुंतवणूक केली. मात्र गंदेवारने त्यांना बांधकाम करून दिले नाही. तो वारंवार टाळाटाळ करत होता.

लाहोटी यांनी चौकशी केली असता ती मालमत्ताच गंदेवारच्या नावावर नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर लाहोटी यांनी त्याला पैसे वापस मागितले असता त्याने एप्रिल २०२३ मध्ये त्यांना ३० लाख रुपये परत केले. मात्र एक कोटी रुपये परत करण्यास तो परत टाळाटाळ करू लागला. अखेर लाहोटी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात गंदेवारविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर