शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 9:15 PM

Nagpur News ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला.

नागपूर : ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला. प्राथमिक चाैकशीत तो गांजा तस्कर असल्याचे स्पष्ट झाले. तुषार चंद्रशेखर सावरकर असे त्याचे नाव असून तो झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे.

तुषार गांजा तस्करीत आणि विक्रीत सक्रिय आहे. आरपीएफ सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्याने ओडिशामधील कांताबाजी येथून नागपूरचे रेल्वेचे जनरल तिकिट घेतले आणि गांधीधाम एक्सप्रेसमध्ये बसला. ही गाडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. मोमिनपुरा भागाजवळ सिग्नल क्लियर नसल्याने गाडीचा वेग कमी झाली. रेल्वेस्थानकावर गेल्यास पकडले जाण्याचा धोका असल्याची शंका असल्याने तुषार चालत्या गाडीतून खाली उतरला आणि लगबगीने फलाटाच्या पलिकडे जाऊ लागला. त्याची ही कृती संशयास्पद वाटल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याला पकडले. विचारपूस करतानाच त्याच्या जवळची बॅग तपासली असता त्यात २ किलो गांजा आढळला. त्याने तो ओडिशामधून आणल्याची कबुली दिली. दरम्यान, आज सोमवारी सकाळी आरपीएफने तुषारला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पुढील चाैकशी सुरू आहे.कारवाईबाबतची गोपनियता संशयास्पदआरपीएफच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार तुषारला रविवारी सकाळी पकडण्यात आले. तो एकटाच होता आणि त्याच्याकडे दोनच किलो गांजा होता तर मग पकडल्यानंतर चार-सहा तासांच्या चाैकशीनंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली का केले नाही. आरोपीला रेल्वे पोलिसांना सोपविण्यासाठी सोमवारची सकाळ का उजाडली, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, थोड्या-थोडक्या कारवाईची माहिती लगेच सोशल मिडिया ग्रुपवर टाकणाऱ्या आरपीएफने या कारवाईची माहिती सोमवारी रात्रीपर्यंत का दिली नाही, असाही प्रश्न आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी