शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

नागपूरचा चांगला रिपोर्ट जगभरात जाणार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 4:19 PM

जी-२० परिषदेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये

नागपूर : जी२० परिषदेची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूरचा चेहरामोहरा बदललाय, अतिशय चांगली तयारी झाली आहे. आलेल्या लोकांना नागपूरचं वैभव पाहायला मिळेल. त्यांचं आपण उत्तम स्वागत करू, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जी२० परिषदेसाठी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.

आतापर्यंत मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जी परिषद झाल्या त्याच्या अतिशय चांगले रिपोर्ट जगभरात गेले आहेत. तसाच चांगला रिपोर्ट नागपूरचादेखील गेला पाहिजे असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे उत्साही आहोत, अशी  प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

सी-२० साठी उद्या रंगीत तालीम; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; २० मार्च रोजी उद्घाटन

नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून उत्तम तयारी करण्यात आली आहे. एकूणच सिविल सोसायटीची एंगेजमेंट असल्यामुळे वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी येथे येणार आहेत त्यामुळे निश्चितच समाजोपयोगी ठराव त्याठिकाणी होतील असेही भाव फडणवीस यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सी-२० परिषदेच्या प्रतिनिधींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत व नियोजित ठिकाणी प्रस्थान होण्याच्या दृष्टीने चोख व्यवस्था पार पाडण्यासाठी शनिवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रंगीत तालीम घेतली जाणार आहे. १९ मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे या परिषदेसाठी शहरात आगमन होणार आहे. २० मार्च रोजी दुपारी रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-२० परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यासह जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर